मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 13/02/2026 :
मोबाईलचा अती वापर ही फक्त मुलांचीच समस्या राहिली नसून पालक सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलच्या जगात गुंतलेले आहेत. हातात, खिशात किंवा बसतो, झोपतो तिथे शेजारी मोबाईल असावाच लागतो अशी प्रत्येकाची मानसिकता झाली आहे.
मोबाईलवर संपर्कासाठी संभाषण वगैरे ठीक आहे. पण त्यावरील वेगवेगळ्या अँपमध्ये देहभान विसरून एकरूप होणे हे शब्दशः जीवाला घातक आहे हे सुद्धा लक्षात येत नाही.
सुरुवातील तरुण मुले रील्स करत होते, नंतर तरुणी. आता तर सेवानिवृत्त, वृद्ध रिल्स करण्यात व पाहण्यात गुंग झालेले दिसतात. यांच्याकडून पुढील पिढीने काय संदेश घ्यावा?
आजचा संकल्प
कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा घातक असतो. त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात, पिढ्या बरबाद होतात हे लक्षात घेऊ व गरजेपुरता मोबाईलचा वापर करू._
सौ. स्नेहलता स. जगताप
===≈======≈======≈==

0 टिप्पण्या