मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 15/02/2026 :
आपण इतरांशी बोलताना नेमके तेच बोलणे योग्य असते. कधी कधी अघळ-पघळ बोलण्याच्या नादात आपण भलतेच बोलून बसतो अन् समोरच्या माणसाचे गैर समज होतात.
जे बोलतो त्यात सच्चेपणा असावा. खरे व योग्य तेच बोलावे. दुसऱ्याची फसवणूक करणे, रागात बोलणे, घालून पाडून बोलणे हे पूर्णतः चुकीचे आहे. कमी बोलावे व जास्त ऐकावे.
बहुश्रुत व्यक्ती अभ्यासपूर्ण व नेमके बोलते. पूर्ण माहितीने बोलणे व अर्धवट बुद्धी पाजळणे यातील फरक ऐकणाऱ्याच्या सहज लक्षात येतो. समोरच्याने लक्षपूर्वक ऐकावे असे बोलणे ज्याला जमते ती व्यक्ती सभा जिंकते, लोकांची मने जिंकते.
आजचा संकल्प
विनाकारण बडबड करून लोकांचे डोके उठवण्यापेक्षा कामाचे, नेमके बोलू व ऐकणाऱ्यांची मने जिंकू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=================

0 टिप्पण्या