सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील” यांची जयंती संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 15/01/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. १४/१/२०२६ रोजी कै. सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांची १०८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जयंती निमित्त त्यांच्या महान कार्याची थोडक्यात माहिती दिली त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यातून प्रेरणा व प्रोत्साहन आजच्या पिढीने घ्यावे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रा. भारती चंदनकर व महाविद्यालयातील विद्यार्थी श्रेया शिंदे, मानसी माने यांनी सहकार महर्षिंच्या जीवनावर अतिशय सुंदर अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीसाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 टिप्पण्या