मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 15/01/2026 :
भविष्याचा विचार करताना नेहमी चांगला व सकारात्मक करायचा. जे होईल ते चांगले होईल, चांगल्यासाठीच होईल ही मनाची धारणा ठेवायची. आपले विचार आपल्याला चांगलेच करण्याची व वागण्याची दिशा देतात.
खरे तर भविष्यात काय होईल, कसे होईल, मनासारखे होईल का नाही असे निरर्थक विचार करण्यात आपण आपल्या वर्तमान काळातील अमूल्य वेळ विनाकारण वाया घालवतो.
चिंता करण्यापेक्षा आपला भविष्यकाळ जसा हवा त्याला पोषक कृती करू. यातून आपला वेळ तर वाचतोच पण विनाकारण वाटणारी चिंता लागून रहात नाही आणि व वर्तमान काळ पण समाधानात जातो. चिंतेने मानसिक आरोग्य बिघडते.
आजचा संकल्प
आपण सर्वजण भविष्याची चिंता करण्यात वर्तमान काळ वाया घालवण्यापेक्षा भविष्य घडवण्यासाठी तो सत्कारणी लावू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या