मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 22/01/2026 : आपल्या स्वभावातील आपलेपणा, चांगुलपणा हा सर्वांना भावतो. तो कुठून आणता येत नाही तर आतून असावा लागतो. तो आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना जाणवतो.
सकारात्मक विचार, संवेदनशील मन, समजुतदारपणा, कणव, माया, प्रेम अशा एकएक सद्गुणांमधून स्वभाव बनत जातो. प्रसंगानुरूप आपण समोरील व्यक्तीशी आपलेपणाचे नाते जोडू शकतो.
त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा वेगळे काही कष्ट करावे लागत नाहीत. अगदी सहज समोरची व्यक्ती आपलीशी होते. कायमस्वरूपी घट्ट नाते तयार होते.
आजचा संकल्प
कमावलेली सर्व भौतिक संपत्ती मागेच राहणार आहे. त्यामुळे जी मनाची श्रीमंती आपल्याला शाश्वत आनंद देते ती कमावण्याचा प्रयत्न करू व इतरांनाही आनंदित करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या