महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील बदल
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : भाग्यवंत ल.नायकुडे,
अकलूज दिनांक 25/01/2026 :
महाराष्ट्रातील शहरी मुस्लिम मतदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ही वस्तुस्थिती महापालिका २०२६ च्या निवडणुकीत सिद्ध झाली आहे.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे ११२ नगरसेवक निवडून येणे म्हणजे मुस्लिम मतदारांनी स्वतः चा हक्काचा राजकीय पर्याय निवडणे होय.
मुस्लिम समुदायाने आपलं संरक्षण कर्त्या कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला सोडून देऊन एमआयएम सारखा राजकीय पक्ष का निवडला.? मला वाटतयं या दिशेने गांभीर्याने विचार केला तर मुस्लिम समुहाची बदललेली मानसिकता समजून घ्यायला मदत होईल.
मुस्लिम मतदारांनी कॉंग्रेस पक्षाला किंवा ढोंगी पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झिडकारण्याची ही प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे.
मानसिक पातळीवर पुर्वानुभवानंतरच बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून एमआयएम सारखा पर्याय निवडण्याच्या पाठिमागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रस्थापित कॉंग्रेस या राजकीय पक्षाने अल्पसंख्याक समुहाला अर्थात मुस्लिम समुहाला कट्टरवादी संघाची भिती दाखवून मते ओरबाळण्याची प्रक्रिया अनेक दशकापासून राबविली आहे. त्यासाठी प्रत्येक निवडणुकी अगोदर हिंदू, मुस्लिम दंगे घडवून नरसंहार घडवून अल्पसंख्याक समुहाला भितीच्या सावटाखाली नेतं त्यांची मते ओरबाळणे हा खेळ चालतं राहिला. कट्टरवादी संघाची मंडळी तुम्हाला सुरक्षित जीवन जगू देतं नाहीत. तुम्हाला सुरक्षितता हवी असेल तर आम्हाला मते द्या आम्ही सत्तेत बसलो तर तुमचे संरक्षण करु या करारानुसार मुस्लिम मते कॉंग्रेस पक्षाला मिळतं आणि कॉंग्रेस पक्ष सत्तेत बसतं राहिला.
१९९२ साली कॉंग्रेस पक्षाच्याच राजवटीत बाबरी मशीद उध्वस्त झाली. आणि तिथूनच मुस्लिम समुहाला कॉंग्रेसच्या संरक्षण करण्याच्या भुमिकेवर संशय आला. परंतु कॉंग्रेसमधील मुस्लिम नेतृत्वाने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मुस्लिम समुहाला कॉंग्रेस पक्षाकडे बांधून ठेवण्याच्या करामती, हिकमती करीत हा गाडा ओढतं राहिले.
आता ऊघडं ऊघडं कॉंग्रेस पक्षाचे नेते भाजपामध्ये जाऊन सत्ता ऊपभोगतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, शरद पवार भाजपा आरएसएसच्या भवताली पिंगा घालतं आहेत हा ऊघडा नागडा तमाशा मुस्लिम समुहातील शिकलेला तरुण बघतं बघतं राजकीय शहाणपणा अंगिकारु लागला आणि बदल घडू लागला.
मुंब्रा मधील सेहर शेख हिला का डावलले.? तिच्या वडीलांच्या जीवावर तुम्ही आमदारकी भोगायची मात्र तिला साधं नगरसेवक झालेलं तुम्हाला मान्य नसेल तर बदल घडणारच आहे.
मुस्लिम समुहाने ढोंगी पुरोगामी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणे हा मानसिक पातळीवरून आलेला निर्णय आहे. एकदम आणि सहजासहजी घडलेली प्रक्रिया नाही हे समजून घेतले पाहिजे.
मुस्लिम समुह राजकीय दांभिकता ओळखून आहे आणि आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करु पहातोय. अशावेळी मुस्लिम समुहाला एमआयएम हा राजकीय पर्याय योग्य न्याय देऊ शकेल का.?? हा खरा प्रश्न आहे.
एकट्या मुस्लिम समुहाच्या बळावर आरएसएस भाजपा सोबतं लढून तग धरता येईल का.? राजकीय आखाड्यात धर्मांधतेने ऊच्छाद मांडलेल्या दुषीत पार्श्वभूमीवर एमआयएम हा प्रबळ, दमदार राजकीय पर्याय होऊ शकत नाही हे सुशिक्षित मुस्लिम तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे.
एमआयएम च्या नावाखाली ध्रुवीकरणाचा खेळ खेळून पुन्हा संघ यशस्वी होणार असेल तर या मुस्लिम मतदारांच्या बदललेल्या भूमिकेने आपला परिघ विस्तारला पाहिजे. संविधानवादी समुहाशी जवळीक साधली पाहिजे. संघाच्या धोरणाला कडाडून विरोध करणारा सच्चा साथीदार निवडला पाहिजे ही काळाची गरज आहे.
स्वअस्तित्वा साठी ढोंगी सोबती सोडून दिला हे बरे झाले मात्र एकट्याने लढून दमछाक होईल ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सच्चा साथी निवडलाच पाहिजे हेही वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.
आपणं परिवर्तनावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. बदल सकारात्मक झाला पाहिजे हीच अपेक्षा.
93 26 36 53 96

0 टिप्पण्या