विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 15/01/2026 :
घरी, शाळेत आपल्यापुढे नेहमी यशस्वी झालेल्या थोर पुरुषांची चरित्रे ठेवली जातात. त्यामध्ये त्यांच्या बालपणापासून, त्याची जडण-घडण, हाल-अपेष्टा, अडचणी आणि त्यावर केलेली मात, याविषयी माहिती दिलेली असते.
हे सर्व वाचणे, समजून घेणे फार महत्वाचे आहे कारण आपण फक्त यशस्वी झाल्यानंतरचे मान-सन्मान, हार-तुरे असा मोठेपणा पाहतो. आपल्याला ते फार आवडते. आपल्या पण जीवनात मोठे झाल्यावर असे प्रसंग यावेत असे वाटते. मुलांनो, हे सर्व सहजासहजी मिळत नाही. यामागे खूप मोठी तपश्चर्या असते. कष्ट असतात. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यामागे आई-वडील, आप्त-स्वकीय यांचे पण योगदान असते.
मुलांनो यशस्वी होण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या प्रतिमा, त्यांच्यातील प्रतीभा यांचे आपण अनुकरण करणे गरजेचे असते. एखादे व्यक्तिमत्व घडण्यासाठी बऱ्याच प्रसंगातून जावे लागते. मुलांनो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या