"आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत करावी लागेल"- डी वाय एस पी प्रदीप गोरड
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 10/01/2026 : "आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत करावी लागेल" असे विचार डी वाय एस पी प्रदीप गोरड यानी व्यक्त केले. रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे (ता.माळशिरस जि. सोलापूर) येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान देताना ते बोलत होते. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करताना आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी कशाप्रकारे मात केली हे सांगितले. सात वर्षाच्या अखंड प्रवासात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी जे पाहिले होते ते त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करताना परिश्रम करावे लागेल मग त्या ध्येयासाठी कितीही अडचणी आल्या तरीही मागे सरू नये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सक्सेसफुल ऑफिसर बनण्यासाठी एका अधिकाऱ्यांमध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असाव्यात व पोलीस खात्यामध्ये अधिकारी होण्यासाठी महत्वाची कॉलिटी म्हणजे "शिस्त" विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व त्यांनी पटवून दिले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व आपले ध्येय निश्चित करावे. ध्येयनिश्चित असेल तर विद्यार्थ्यांना यश हे नक्कीच मिळेल हे सांगितले.
प्रत्येकाने डॉक्टर इंजिनियर अधिकारी वकील बनवण्यासाठी एक स्वप्न पाहिलेले असते. त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो तेव्हाच आपण आपले स्वप्न ध्येय पूर्ण करू शकतो. असे संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमासाठी गोरख गोरड, ॲड. संदीप वाघमोडे, दुर्योधन गोरड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, सचिव प्रमोद अ. दोशी , संस्थेचे संचालक रामदास कर्णे , दत्ता भोसले , ॲड. ज्ञानदेव कचरे, संस्थेचे मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमृता मोहिते यांनी केले तर आभार संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता देसाई यांनी मानले.



0 टिप्पण्या