मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/01/2026 :
आपल्या घरातील मुलांना शिस्त असावी, दैनंदिन जीवनात त्यांनी सर्वसाधारण नियम, शिस्त आचरणात आणावी अशी आपली भूमिका असते. मुलांचे काही चुकले तर आपण त्यांना धारेवर धरतो.
चार माणसात आपल्याला अपमान वाटतो. मुलांनी आपली अब्रु घालवली म्हणून आपण खजिल होतो. परिणामतः मुलांच्यावर राग निघतो, त्यांची अक्कल काढतो आणि स्वतःला देखील त्रास करून घेतो.
मुलांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापूर्वी आपण थोडे आत्मनिरीक्षण करणे गरजेचे असते. जसे मुलांनी वागावे-बोलावे वाटते तसे आपण स्वतः वागतो का? त्यांच्यापुढे आपला आदर्श असतो का?
आजचा संकल्प
मुलांनी आदर्श वागावे वाटत असेल तर आपण त्यांच्यापुढे आदर्श ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊ व मुलाना संस्कारीत करु._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या