सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...

 

सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा... 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 26/01/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज, जि.सोलापूर या कारखान्यामध्ये २६ जानेवारी २०२६ रोजीचे आपल्या भारत देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते सकाळी ८.०० वाजता संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख व कामगार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले.

त्यानंतर कारखाना मुख्य कार्यालयासमोरील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्यास  मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, रामचंद्र सिद, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख, माजी संचालक भिमराव काळे, मोहनराव लोंढे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडुरंग एकतपुरे तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अनिल काटे, चिफ् अकाउंटंट-युवराज इनामदार, मुख्य शेतकी अधिकारी रविराज उर्फ समाधान चव्हाण, चिफ इंजिनिअर सुर्यकांत गोडसे, को जन मॅनेजर युवराज निंबाळकर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या