खोकला होईल कमी, घशात साचलेला सगळा कफ निघून जाईल! ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा रस प्या; आचार्य बालकृष्णांचा प्रभावी घरगुती उपाय
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 :
Phlegm in Throat Winter: खोकला थांबत नाही, घशात सतत कफ साचतोय? औषधं घेऊनही आराम मिळत नसेल तर कारण तुमच्या स्वयंपाकघरातच लपलेलं असू शकतं… आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलेला हा साधा घरगुती उपाय वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
Dry Cough in Cold Season: हिवाळा सुरू झाला की अनेक जण एका त्रासाने हैराण होतात; सतत खोकला, घशात खवखव, कफ साचल्यासारखी भावना आणि श्वास घेताना होणारी अडचण. काहींना कोरडा खोकला सतावतो, तर काहींच्या छातीतून कफ सुटतच नाही. औषधं घेतले, काढे प्यायले तरीही आराम मिळत नाही, अशी तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळते.
या ऋतूमध्ये हवेत आर्द्रता कमी होते. श्वास घेताना ही कोरडी हवा थेट घसा आणि श्वसनमार्ग कोरडे करते, त्यामुळे आतून जळजळ निर्माण होते आणि खोकल्याची सुरुवात होते. त्यातच थंडीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. याच संधीचा फायदा घेत विषाणू आणि जंतुसंसर्ग सहज हल्ला चढवतात.
थंड व कोरड्या वातावरणात काही विशिष्ट विषाणू अधिक वेगाने वाढतात. सर्दी, ताप आणि खोकल्यामागे हेच मुख्य कारण ठरते. थंडीपासून बचाव करण्यासाठी घरातील दरवाजे-खिडक्या बंद ठेवले जातात, परिणामी खोलीतील धूळकण, सूक्ष्म जंतू आणि अॅलर्जी निर्माण करणारे घटक बाहेर न जाता आतच साचून राहतात. हीच हवा आपण पुन्हा पुन्हा श्वासात घेतो आणि त्रास वाढतो. त्यातच उष्णता देणाऱ्या उपकरणांचा अति वापर हवेला अधिक कोरडे बनवतो, ज्याचा थेट परिणाम घशावर होतो.
खोकल्याचे दोन मुख्य प्रकार हिवाळ्यात अधिक दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे कोरडा खोकला या खोकल्यात कफ बाहेर पडत नाही. घशात सतत खाज, खरखर जाणवते, खोकताना छातीत वेदना होतात; मात्र काहीच बाहेर येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे कफयुक्त खोकला. यात छाती किंवा घशातून कफ बाहेर पडतो. शरीर आत साचलेला संसर्ग बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे श्वास घेताना जडपणा, घरघर असा आवाज येतो.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी फक्त औषधांवर अवलंबून न राहता शरीराला नैसर्गिक आधार देणे अधिक महत्त्वाचे असते. काही घरगुती उपाय असे आहेत, जे श्वसनमार्गातील सूज कमी करतात, कफ पातळ करतात आणि घशाला आतून शांत करतात. आधुनिक संशोधनदेखील काही नैसर्गिक घटकांचे हे गुणधर्म मान्य करते.
संशोधनानुसार, काही उष्ण गुणधर्म असलेले घटक श्वसनमार्गातील स्नायूंना सैल करतात. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि खोकल्याची तीव्रता कमी होते. तसेच शरीरात साचलेला घट्ट कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या दोन्ही पध्दती या घटकाच्या प्रभावीपणावर एकमत दर्शवतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा प्रभावी उपाय कोणत्याही औषधालयात नाही, तर भारतीयांच्या रोजच्या जेवणापासून ते चहापर्यंतचा महत्वाचा घटक असलेला आले आहे.
आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलेला प्रभावी उपाय
आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, आलं (अदरक) हे उष्ण गुणधर्म असलेले अत्यंत प्रभावी औषधी द्रव्य आहे. आलं श्वसनमार्गातील सूज कमी करते, घशातील खवखव शांत करते आणि खोकल्याची तीव्रता कमी करण्यास मदत करते. तसेच छातीत घट्ट साचलेला कफ पातळ करुन तो सहज बाहेर पडण्यास उपयोगी ठरते.
ते सांगतात की, सुमारे पाच गॅस रस मिळतो. हा आल्याचा रस मधासोबत घेतल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी दिसून येतो. याशिवाय, आल्याचा काढा किंवा चहामध्ये आलं घालून सेवन केल्यास सर्दी खोकल्याच्या त्रासात लवकर आराम मिळतो.
संशोधन काय सांगते?
आधुनिक संशोधनही आल्याच्या या गुणधर्मांना दुजोरा देते. आल्यामध्ये असलेले सक्रिय घटक श्वसनमार्गातील स्नायूंना सैल करतात, त्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि खोकल्याची वारंवारता कमी होते. तसेच आल्याची उष्णता शरीरात साचलेला घट्ट कफ विरघळण्यास मदत करतो.
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही पध्दती आल्याच्या औषधी गुणध्रर्मांवर एकमत दर्शवितात, म्हणूनच सर्दी खोकल्यावर आलं हा नैसर्गिक आणि विश्वासार्ह उपाय मानला जातो.

0 टिप्पण्या