"आपल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो"- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 12/12/2025 :
"आपल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो.आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावीत रहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल", असे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांनी तपासात दाखवलेले तपास कौशल्ये आणि कर्तव्यनिष्ठा याची प्रशंसा करताना म्हटले.
अकलूज पोलीस स्टेशनच्या एका कर्तव्यनिष्ठ पथकाचा महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा जलद आणि यशस्वी तपास केल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस दला तर्फे मंगळवार दि.9 डिसेंबर 2025 रोजी विशेष गौरव करताना ते बोलत होते.
अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सहायक पोलीस निरीक्षक स.पो.नि. योगेश लंगुटे, पोलीस हवालदार पो. ह. समीर पठाण, पो.ह. अमोल बकाल, आणि पो.ह.रणजित जगताप यांचा समावेश होता.
अकलूज पोलीस ठाण्यात गुरनं ७२५/२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), आणि ३८५ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निरज उबाळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी वेळेत आणि उत्कृष्टपणे पूर्ण केला. त्यानिमित्त पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान आज सन्मान सोहळा संपन्न झाला.


0 टिप्पण्या