कुलदीप सिंग सेंदर: राजकीय व्यवस्थेचा क्रूर, भयावह चेहरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 :
कुलदीपसिंग सेंदर या उत्तर प्रदेशाच्या माजी आमदाराला जन्मठेप भोगताना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्या जामीन देण्याविरुद्ध उन्नाव बलात्कारातील पीडिता इंडिया गेटला उपोषणाला बसल्यावर तिला अटक करून नेण्यात आले..भारतीय पुरुषसत्ताक व्यवस्था आणि राजव्यवस्था आणि अशांचे रक्षण करणारे राजकीय नेते एकत्र आल्यानंतर किती नीच वागू शकतात याचे कुलदीपसिंग सेंगर हे उदाहरण आहे...बलात्काराविरुद्ध न्याय मागताना एखाद्या मुलीचे संपूर्ण आयुष्य कसे उध्वस्त होते याचेही हे प्रकरण उदाहरण आहे.
सुदैवाने सीबीआयने याविरुद्ध कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे व सोनिया गांधी राहुल गांधी यांनीही त्या मुलीला चांगला वकील देण्याची तयारी दाखवल्यामुळे कदाचित जामीन रद्द होईल ही पण हे किती भयानक आहे की आत्याचार करणारे पूर्णवेळ तुरुंगात राहण्यासाठीही आता संघर्ष करावा लागतो..
कुलदीपसिंह तेव्हा आमदार असल्यामुळे एक मुलगी नोकरी मागायला जाते. तो तिच्यावर तिथे बलात्कार करतो. त्यावर समाधान होत नाही. पुन्हा गुंड पाठवून तिचे अपहरण करतो गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अनेकदा सामुदायिक बलात्कार केला जातो. ती तक्रार नोंदवायला गेल्यानंतर आमदारांचे नाव टाकू नको.यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला जातो. शेवटी न्यायालयात जाऊन तिला तो गुन्हा नोंदवावा लागतो. त्याचा राग येऊन तिच्या वडिलांवर काहीजण हल्ला करून मारहाण करतात. पुन्हा मारहाण करणारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करतात..
त्या गुन्ह्याच्या आधारे तिच्या वडिलांना तुरुंगात टाकले जाते. आणि तुरुंगात इतकी मारहाण होते की कोठडीत तिच्या वडिलांचा मृत्यू होतो. वडिलांच्या मृत्यूसाठी पुन्हा तिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जावे लागते. एक दिवस वकील आणि तिच्या दोन मावश्या यांच्याबरोबर ही गाडीतून जात असताना त्या गाडीला नंबर प्लेट नसलेल्या ट्रक कडून अपघात घडवला जातो.त्यात तिच्या दोन्ही मावशांचा मृत्यू होतो. वकील आणि ती जखमी होते.
आणि पुन्हा पुन्हा न्यायालयात स्वतःवरचा बलात्कार वडिलांचा मृत्यू आणि घडवलेला अपघात यात आमदारांचा हात सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्ट घेऊन त्याला ती तुरुंगात पाठवते पण ते समाधानही आता टिकेल का...?
कारण जामीन मंजूर झाल्याने ती सैरभैर झाली आहे ..तिने इंडिया गेट समोर देशाचे लक्ष लोकांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले तर त्यातही तिला अटक झाली.. आता सेंदर चा पुन्हा जामीन रद्द व्हावा म्हणून संघर्ष करावा लागणार आहे...
बिलकिस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा माफ झाली आणि त्यांचे सत्कार झालेले आपण बघितले ती जखम विसरतो, न विसरतो तेच पुन्हा या पीडितेचा आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
एक तर अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही. गुन्हे दाखल झाले तर शिक्षा लागत नाही. शिक्षा लागल्या तरी पुन्हा पुन्हा त्यांना आत घालण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि ही वेदना बघितल्यानंतर या देशात अशा गुन्हेगारांचा निषेध करणे सोडाच पण त्यांना त्यातून सोडवण्यासाठी राजकीय व्यवस्था काम करत असेल तरी किती वेदनादायक आणि तमाम स्त्रियांना निराश करणारे आहे...
भारतीय जनता पार्टीतील ज्या महिला आहेत त्यांनी कधीतरी राजकीय निष्ठा बाजूला ठेवून बिल्कीस बानोचे आरोपी आणि सेंगर आणि त्यांना पाठीशी घालणारे नेतृत्व याविरुद्ध ...ठामपणे बोलले पाहिजे...बेटी बचाव बेटी पढाव या घोषणा करणाऱ्या पक्षात अशा घटनांवर सन्नाटा असतो...स्वतःच्या मुली असणारे कार्यकर्ते अशा घटनांनी अस्वस्थ का होत नसतील ? दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षात सामाजिक मुद्दे आले की सारे गप्प होतात....
कदाचित जनरेटा आणि न्यायालयीन लढाईत यामुळे सेंगरचा जामीन रद्द होईलसुद्धा पण एका न्यायाची किंमत किती भीषण असते... हे त्या मुलीने अनुभवले आहे वडिलांचा कोठडीत मृत्यू दोन मावशांचा मृत्यू अपघातात जखमी होणे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात लढाई लढताना लाखो रुपयांची असलेली नुकसान होते.....
सत्य सत्य आपण म्हणतो त्या सत्याची किंमत इतकी उध्वस्त करणारी असते का...?
हेरंब कुलकर्णी
0 टिप्पण्या