"श्री शंकर" स.सा. कारखाना एक लाख एक हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पुजन संपन्न



 "श्री शंकर" स.सा. कारखाना एक लाख एक हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पुजन संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 15/12/2025 : सोलापूर जिल्ह्यातील श्री शंकर सह. साखर कारखाना लि सदाशिवनगर (तालुका माळशिरस) सन 2025-26 गळीत हंगामामध्ये उत्पादीत झालेल्या एक लाख एक हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पुजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.


यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि विधान परिषदेचे आमदार  रणजितसिंह मोहिते पाटील,सौ सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी,  माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते - पाटील, सौ शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे संचालक, यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, चिफ इंजिनिअर  समाधान कागदे, जनरल मॅनेजर रविराज जगताप, चिफ केमिस्ट अभिजित माने, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, ऊस विकास अधिकारी कोडलकर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, निकम, शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, कामगार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या