काँग्रेसची तातडीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज मध्ये संपन्न

 

काँग्रेसची तातडीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज मध्ये संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 12/10/2025 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (काँग्रेस प्रांताध्यक्ष कार्यालयाशी संलग्न) प्रदेश सरचिटणीस अमित अनंतराव कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 

या बैठकीस प्रदेश सरचिटणीस अमित अनंतराव कारंडे, माळशिरस तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, रमेश अंकुश नामदास, धनाजी श्रीपती मस्के, इमरान जब्बार बागवान, करण रावसाहेब वगरे, गिरीश शिंदे, वाघ, निलेश जालिंदर पगारे, शिवाजी श्रीपती मस्के, सुखदेव भीमराव तांबवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रदेश सरचिटणीस कारंडे यांनी "वोट चोर गद्दी छोड" संदर्भात सह्यांची मोहीम, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अभियान याबाबत मार्गदर्शन करून जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणूक, अकलूज नगरपरिषद निवडणूक  संदर्भातील रणनीती बाबत सखोल चर्चा आणि मार्गदर्शन केले. तसेच माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी पदासाठी  इच्छुकांची नावे नोंदवून घेण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या