🔵 "काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे कार्य आपण करीत आहोत"- जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार
🟡 माळशिरस तालुक्यात जिल्हाध्यक्षांचे जंगी स्वागत आणि सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/11/2025 : काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत घराघरात पोहोचविण्याचे कार्य आपण करीत आहोत. ही अभिमानास्पद बाब आहे असे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांनी अकलूज येथे म्हटले. मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालयास मध्ये आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना, ज्यांच्या आचार विचारांमध्ये आणि रक्तात काँग्रेस रुजलेली आहे अशीच माणसे काँग्रेसचे काम निष्ठेने करीत असतात तर काहीजण पक्षात येऊन मोठे होऊन अन्य पक्षात जाणारेही बरेच असतात असा टोलाही कोणाचे नाव न घेता जिल्हाध्यक्ष शटगार यांनी मारला. शेवटी निसर्ग नियम आहे, ब्रम्हांडात काहीही स्थिर नाही. सर्व फिरत असते. एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट कायमस्वरूपी स्थिर नाही. सारखी फिरत असते. असेही त्यांनी म्हटले. माळशिरस तालुका जिल्ह्यापासून सर्वात लांब असून देखील सर्वात अगोदर या तालुक्यातील माहिती आमच्यापर्यंत येत असते. अशा शब्दात त्यांनी तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांच्या पक्ष कार्यतत्परतेचे आवर्जून कौतुक केले.
जिल्हाध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांचे गिरीश शेटे यांच्या संपर्क कार्यालयात आगमन होताच गिरीश शेटे यांनी त्यांचे स्वागत करून मानाची गांधी टोपी, उपरणे आणि बुफे देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या टीमने अध्यक्षांचा सत्कार केला तर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांनी मानाचा फेटा बांधून जिल्हाध्यक्षांचा सन्मान केला.
या बैठकीस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सातलिंग आ. शटगार, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय अधीक्षक शंकर निवृत्ती गायकवाड, प्रेस फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संभाजी साठे, तालुका सरचिटणीस सुभाष सरतापे व संतोष कांबळे, डॉ. उदयसिंह पवार, गिरीश शिंदे, राजेंद्र डोंबे, अनिकेत खंडागळे, अविनाश जगताप, हिरालाल मोरे, मुन्ना शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गिरीश शेटे, राजाभाऊ गायकवाड यांनीही बैठकीस संबोधन केले. शेवटी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




0 टिप्पण्या