🛑 ओंकारच्या इथेनॉलचे पहिले पाच टँकर मध्यप्रदेश व गुजरात कङे रवाना 🟠 प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते गाङ्यांचे पुजन


🛑 ओंकारच्या  इथेनॉलचे पहिले पाच टँकर मध्यप्रदेश व गुजरात कङे रवाना

🟠 प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते गाङ्यांचे पुजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 6/8/2025 : संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते गाङ्यांचे पुजन होऊन ओंकारच्या  इथेनॉलचे पहिले पाच टँकर मध्यप्रदेश व गुजरात कङे रवाना झाले. अनेक समस्यांवर मात करीत उपपदार्थ प्रकल्प हाती घेतले व ते यशस्वी करून दाखविल्याने ओंकार परिवाराची ही यशाची पहिली पायरी आहे. 

ओंकार साखर कारखाना  चांदापुरी या साखर कारखान्याला  महत्वकांशी उप पदार्थ  प्रकल्प असावेत अशी  चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांची संकल्पना होती. ती संकल्पना आज पुर्ण झाली 150 लाख के एल् पी चा इथेनॉल प्रकल्पातुन दर्जेदार इथेनॉलचे पाच टँकर रिलायन्स इंडस्ट्रीज मध्यप्रदेश  व नायरा ग्रुप  गुजरात येथील पेट्रोलीय कंपन्यांकङे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते पुजन करून रवाना केले या वेळी आधिकारी कर्मचारी वर्गाने आनंदोत्सव साजरा केला. या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील, संजय देशमुख, सावता शिंदे,  मेजर मोहन घोङके यासह सर्व आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या