सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 : शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. १५/८/२०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा थोडक्यात सांगितला व देश प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत रहावे असे सांगितले. स्वातंत्र्य दिन साजरा करते वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यामध्ये त्यानी महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती थोडक्यात सांगितली व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी थोर क्रांतीकारकांनी केलेल्या कार्याची माहिती आजच्या पिढीतील विद्यार्थी कु. मानसी माने व कु. अदिती जगताप यांनी सांगितली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. संजय झंजे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. भारती चंदनकर यांनी केले.
0 टिप्पण्या