वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 :
दैनंदिन जीवनात बोलणे व ऐकणे हे एक प्रकाराचे नित्य कर्म आहे. आपण इतरांशी बोलत असतो तसे इतरांचे ऐकत असतो. क्वचित स्वतःशीच बोलतो व स्वतःचे (मनाचे) ऐकतो.
पण इतर वेळेस बोलताना कमी बोलावे, नेमके बोलावे, काही ठिकाणी मौन पाळावे. न बोलणे हा सुद्धा एक सुसंवाद ठरतो. बोलून वाईटपणा घेण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले.
हल्ली नेमके उलट चित्र दिसते. लोक ऐकतात कमी व बोलतात जास्त. नको तिथे नको इतके बोलतात. गोष्टी अगदी अंगलट येतात. नंतर सारवासारव करावी लागते, माफी मागावी लागते किंवा मी असे म्हणलोच नव्हतो म्हणून हात झटकावे लागतात.
आजचा संकल्प
पुढचा-मागचा विचार करून, परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य ते बोलू. जास्तीचे बोलून समोरच्याला अडचणीत आणण्यापेक्षा कमी बोलून भावना व्यक्त करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
0 टिप्पण्या