🟢 विचारधारा

🟢 विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 16/8/2025 : काल रात्री १२ वाजता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. आज दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करणार. नटखट बाळ कृष्णाच्या गोकुळातील लीला आठवणार व सर्वत्र आनंदी आनंद साजरा करणार.

दही, दूध, लोणी हे कृष्णाचे आवडते पदार्थ. अर्थात सर्व मित्रांना बरोबर घेऊन लल्ला हे पदार्थ खात असे. तुम्ही मुलांनी सुद्धा आवड-निवड न करता असे पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत.

गोपाल कृष्ण रानात गाई चारायला जात, झाडांवर चढत, नदीत पोहत . आपण सुद्धा आपल्या पालकांच्या समवेत निसर्गाच्या सानिध्यात वावरले पाहिजे. वनविहार केला पाहिजे, मोकळ्या हवेत फिरले पाहिजे.

मुलांनो, आपल्या वाढीच्या वयात आपण बाळकृष्णाचा आदर्श घेतला पाहिजे.

सौ. स्नेहलता स. जगताप._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या