🟡 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 :
'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' शाळेत असताना आपण रोज अशी प्रतिज्ञा म्हणत होतो. पूर्ण प्रतिज्ञा म्हणताना त्यातील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा अर्थ लक्षात घेतला तर आपले दैनंदिन वर्तन कसे असले पाहिजे ते आपल्या लक्षात येते.
पण अनेकदा आपण म्हणतो किंवा बोलतो त्या प्रत्येक गोष्टीचा व आपल्या वर्तनाचा आपण काहीच संबंध ठेवत नाही. असे वर्तन म्हणजे कृतीविना वाचाळता ठरते.
आपण प्रत्येकाने देशासाठी आपली कर्तव्ये केली पाहिजेत. देश प्रथम या तत्वाने वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक ऐक्य टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असले पाहिजे.
आजचा संकल्प
देशभक्ती हा काही दोन चार दिवस मिरवण्याचा किंवा समजमाध्यमांवर दिखावा करण्याचा विषय नाही. प्रत्येक क्षणी, प्रत्येक कृतीतून, प्रत्येक श्वासातून आपली देशभक्ती दिसली पाहिजे._
सौ. स्नेहलता स. जगताप.
0 टिप्पण्या