🛑 रत्नत्रय शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 : रत्नत्रय शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिना निमित्त प्रमुख पाहुणे अकलूज येथील हृदयरोग तज्ञ डॉ. सौरभ अतुल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांचे संचलन, कवायत झाले. विद्यार्थ्यांची स्वतंत्र दिनाची भाषणे झाली तसेच मंथन,दहावी, बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
" विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चित असेल तर यश हमखास मिळते. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मोबाईल व इंटरनेटचा वापर कमी केला पाहिजे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले लक्ष्य साध्य केले पाहिजे." असे विचार मार्गदर्शन डॉ. गांधी यांनी यावेळी केले. तसेच रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मिहीर भाई गांधी यांनी संस्थेच्या प्रगतीची स्तुती केली व संस्थेच्या अनेक शाखा सुरू करून रत्नत्रय चे नाव काना कोपऱ्यात पोहोचवू त्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगून देशाला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही त्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असे म्हटले.
याप्रसंगी सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी, मृणालीनी दोशी, संस्थेचे संचालक बाहुबली दोशी , निवास गांधी, अजय गांधी,वसंत ढगे,रामदास कर्णे,रामभाऊ गोफणे, संदीप शहा, सुरेश धाईंजे, चंद्रकांत तोरणे, वैभव मोडासे, सतीश बनकर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता मोहिते यांनी केले व आभार प्रदर्शन शहनाज शेख यांनी केले.

0 टिप्पण्या