✳️ मनाची शुद्धता

 


✳️ मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 3/8/2025 :

आयुष्यात प्रत्येकजण ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धावतो आहे. झोप सुद्धा लागत नाही. रात्रीचा दिवस करून, छाती फुटेपर्यंत धावणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकाला थांबायचे कुठे हे समजणे गरजेचे आहे.

आपल्याकडे फक्त कमावण्यासाठी वेळ आहे. आहार-विहार-निद्रा या त्रिसूत्रीचा विसर पडला आहे. कमावणारी मोठी माणसेच फक्त धावत आहेत असे नाही तर *पहिला मी* च्या स्पर्धेत पालकांच्या दबावाखाली शालेय वयातील मुले सुद्धा धावत आहेत.

स्पर्धा परीक्षा व प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठी मुले भरडली जात आहेत. नोकरी मिळवण्या साठी, ती टिकवण्यासाठी, पदोन्नत्तीसाठी व  अशाच कारणांसाठी प्रत्येकजण न थांबता धावतोय; थांबणार कधी?

आजचा संकल्प

_पद, पैसा, प्रसिद्धी जरी महत्वाचे असले तरी आरोग्य त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे हे लक्षात ठेवू व अन्न, वस्त्र व निवाऱ्याइतकीच  निरोगी आरोग्याची गरज आहे हे लक्षात ठेवू._

सौ. स्नेहलता स. जगतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या