शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 :
'स्वातंत्र्यासाठी हुतात्मा ठरलेल्या शूर वीरांच्या व समाज सुधारकांच्या कार्याचे ऋण व्यक्त करणे हे आजच्या पीढीचे आद्य कर्तव्य आहे त्यांच्या कार्यामुळेच आपण स्वातंत्र्याचा स्वछंदी आनंद घेत आहोत व आजच्या तरूणांनी सामाजिक एकता व अखंडता राखण्यासाठी काम केले पाहिजे' असे मत भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून सयाजीराजे मोहिते पाटील (अध्यक्ष,महाविद्यालय विकास समिती)यांनी व्यक्त केले.या स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण त्यांचे शुभ हस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शुभेच्छा देवून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले व्यक्तीमत्व विकसित करावे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अप्पासाहेब मगर, रणजीत माने देशमुख,शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचे प्राचार्य,डॉ.एस.के. टिळेकर,बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य,डॉ.ए.एस. भानवसे,महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूजचे प्राचार्या डॉ.जयश्री धुमाळ,डी फार्मसी कॉलेज अकलूजचे प्राचार्य प्रा.एन. बी.देवडकर,महाविद्यालयातील प्राध्यापक वृ़द, डॉ.विश्वनाथ आवड,डॉ.सतीश देवकर,डॉ.हनुमंत अवताडे,डॉ.संतोष गुजर,डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सौ.सुधा बनसोडे, डॉ.सौ.सविता सातपुते,डॉ. चारूदत्त पवार,डॉ.बाळासाहेब मुळीक, प्रा.अरविंद शेंडगे,प्रा.जयंत माने,प्रा. विनायक सूर्यवंशी,प्रा. दत्तात्रय पाटील,राजेंद्र बामणे (प्रबंधक), अधीक्षक युवराज मालुसरे व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जनार्धन परकाळे यांनी केले.
0 टिप्पण्या