"सहकार महर्षि" साखर कारखान्यामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते सकाळी ठिक ८.०० वाजता संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख व कामगार यांनी राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले.
त्यानंतर कारखाना मुख्य कार्यालयासमोरील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक विराज निंबाळकर, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या