🔵 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 15/8/2025 :
🇮🇳 भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳
स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरत असताना आपण सर्वांनी आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारा की आजचा दिवस मी सुट्टी म्हणून पाहतो का अजून काही?
आपण प्रत्येकाने ध्वजारोहण साठी उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य आहे. हक्कांसाठी मागणी करण्यापूर्वी आपण कर्तव्यपूर्तीचा भावना सतत जागरूक ठेवली पाहिजे. आपण देशहिताचा विचार करूनच आपले वर्तन ठेवले पाहिजे.
देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याचे पवित्र कार्य आपले सैनिक बांधव करत आहेत. अंतर्गत सुरक्षेचे काय? ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या पर्यावरणाचा विचार करणे, परिसर स्वच्छता ठेवणे, आपापसात धर्मनिरपेक्ष संबंध ठेवणे हे सामाजिक भान आपण ठेवले पाहिजे.
आजचा संकल्प
भविष्यातील भारत "बलशाली भारत होवो, विश्वात शोभुनी राहो" यासाठी प्रयत्नशील राहणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ते आपण पूर्ण करू._
सौ. स्नेहलता स. जगताप._
####################

0 टिप्पण्या