💢 देवेद्र फडणवीस, तुमची अंडी-पिल्ली आवरा !

 संपादकीय पान...........✒️

💢 देवेद्र फडणवीस, तुमची अंडी-पिल्ली आवरा !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे.

अकलूज दिनांक 5/8/2025 :

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर भाजपाच्या दिपक काटे नावाच्या गुंडाने जमाव जमवत शाईफेक व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा काटे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे आहेत. महसुलमंत्री बावनकुळे यांचा तो निकटवर्तीय आहे. तसेच भाजपाचा विद्यमान पदाधिकारी आहे. प्रविण  गायकवाड यांच्यावरील हल्ला ही घटना अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून खुप चांगले काम केले आहे. हजारो मुलांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे. अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. हजारो लोकांचे प्रबोधन करत त्यांच्यात शिव, शाहू, फुले व आंबेडकरांचा विचार रूजवण्याचे मोठे काम केले आहे. त्यांच्यासारख्या विवेकी माणसावरचा हल्ला हा केवळ त्यांच्यावरचा नाही तर तो शिव, शाहू, फुले, आंबेडकरांना प्रमाण मानना-या, संविधानावर विश्वास ठेवणा-या प्रत्येक कार्यकर्त्यावरचा आहे. ते अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाला गेले असताना  हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वळचणीला असलेली किंवा पाळीव असलेली अंडी-पिल्ली खुपच मस्तावली आहेत. देशात कायद्याचे राज्य आहे अशी त्यांची मानसिकताच राहिली नाही. केंद्रात सत्ता आमची व राज्यातही आमचीच. त्यामुळे आमचं कोण काय वाकडं करणार ? या घमेंडीने अनेकजण मस्तावले आहेत. राज्यात त्यांचा अक्षरश: उतमात सुरू आहे. महाराष्ट्राचा या लोकांनी पुरता युपी-बिहार करून टाकला आहे. गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्यावर याची जाणिव होते. या सगळ्या बांडगुळांना सत्तेचे पाठबळ आहे. या तथाकथीत बांडगुळांचा मसिहा देवाभाऊ आहे. त्यांच्याच जोरावर हे सगळे मस्तावले आहेत. आम्ही काहीही केले तर आमच्या पाठीशी देवाभाऊ आहे. आमचं कुणच काय वाकडं करू शकत नाही असा त्यांचा समज आहे. भाजपाचे काही मंत्री व आमदार असं जाहिरपणे बोलत आहेत. गेल्या काही दिवसात या सगळ्या चमच्यांनी, अंडी-पिल्ल्यांनी देवेद्र फडणवीसांचा 'देवाभाऊ' केला आहे आणि याच देवाभाऊच्या जीवावर हे सगळे मस्तावले आहेत. कुणीही मंत्री, आमदार उठतो, काहीही बोलतो. संविधानाला, कायद्याला फाट्यावर मारत समाजात तेढ वाढवणारी, जातीय विद्वेष वाढवणारी भाषा वापरतो आहे. 

    देवेंद्र फडणवीसांच्या वळचणीला असणारे तर खुपच बेफाम आणि बेफाट झाले आहेत. सत्तेच्या मग्रुरीतूनच भाजपेयी गुंडाची राज्यभर दादागिरी सुरू आहे. इंद्रजीत सावंतांना धमक्या देणारा, शिवरायांना कसेही बोलणारा कोरटकर, शिवरायांच्या बाबतीत अवमानास्पद बोलणारा भिक्कारचोट राहूल सोलापुरकर असे अनेक नग आणि त्यांची बदमाशी महाराष्ट्र पाहतो आहे. जेष्ठ पत्रकार चित्रलेखाचे संपादक महाराव सरांच्या कार्यालयात घुसून त्यांना झुंडशाहीने माफी मागायला लावणारे, आता प्रविण  गायकवाडांच्या अंगावर शाई टाकत त्यांच्यावर हल्ला करणारे चेहेरे कदाचित वेग-वेगळे असतीलही पण त्यांना प्रसवणारी व त्यांना स्तनपान करणारी एकच माता आहे. तिच्या जोरावरच हे सगळे मस्तावले आहेत. कमळीच्याच पदराखाली हे सगळे नग दडताना दिसतात. कमळीच यांना सत्तेच स्तनपान करते. कमळीच यांना वाचवते. त्यामुळे हे सगळेच मस्तावले आहेत. विरोधकांना जीवंतच ठेवायचे नाही असा मनसुबा त्यांचा दिसतो आहे. कदाचित त्यासाठीच हे हल्लासत्र, दादागिरी सुरू आहे. हल्ला करताना तो प्रविण गायकवाड, महाराव सर अशांच्यावर केला तर बाकीचे आपोआप भेदरतील. सेनापती पडला की सैन्य सैरावैरा पळते. सैन्याचा पराभव करायला जास्त वेळ लागत नाही. ते मानसिकृष्ट्या खचते. त्याचे मनोबल रहात नाही. हा मानसशास्त्रचा विषय आहे. कदाचित यासाठीच ते प्रविण गायकवाड यांच्या सारख्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतील. त्यांच्यावर हल्ला केला की बाकीचे आपोआप पळतील असा त्यांचा समज असावा. देवाभाऊचा आणि कमळीचा असा समज असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. सगळेच लोक बदनामीला, जेल-तुरूंगाला व मरणाला भीत नाहीत. "रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ?" या बाण्याने जगणारे खुप असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचे तेच वैशिष्ठ्य आहे. या मातीत गवताला भाले फुटतात हा इतिहास आहे. अशोक चव्हाण, अजित पवार अशा चार-दोन घोटाळेबाज नेत्यांनी व त्यांच्या काही चेले-चपाट्यांनी शेपट्या घातल्या म्हणजे अवघा महाराष्ट्र झुकला असे होत नाही. महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास देवेंद्र फडणवीस विसरले की काय ? महाराष्ट्र अजून चवथाळलेला नाही. तोवर  देवेंद्रजी तुम्ही तुमच्या अंडी-पिल्यांना आवरा. मराठी माणसाने आजवर भल्या-भल्यांची जिरवली आहे. त्यामुळे देवेंद्रजी या सगळ्या पिलावळींना  तुम्हीच चाप लावा.   

     संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरचा हल्ला हा सहज घेण्यासारखा नाही. यापुर्वी महाराष्ट्राने नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गमावले आहे. या जातीयवाद्यांनीच त्यांचा बळी घेतला आहे. आत्ता वाट्टेल ते झाले तरी चालेल पण कुठला मोहरा गमावता कामा नये. "माणूस मारता येतो पण त्याचा विचार मारता येत नाही !" असे म्हंटले जाते पण हे बरोबर नाही. पानसरे अण्णा गेले, नरेंद्र दाभोळकर गेले चळवळ ठप्प झाली. त्यांचा विचार मेला नाही पण विचारांचा झपाटा मंदावला. त्यांचा जो आवाका होता तो संपला. त्यांचे काम मंदावले. परिणामी पुरोगामी विचाराचे, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचाराचे काम थांबले. त्यामुळे माणूस मेला तरी त्याचा विचार मरत नाही या भ्रमात कुणी वावरू नये. आपल्याला माणसं आणि त्यांचा विचार दोन्ही जपाव लागेल. समाजात हा विचार रूजवणारी प्रविण गायकवाड, महाराव सर, श्रीमंत कोकाटे किंवा या चळवळीत काम करणारे सगळेच बिनीचे शिलेदार जपले पाहिजेत. त्यांचे विचार जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच ही माणसं महत्वाची आहेत. भारताच्या मातीत रूजलेला, बहरलेला गाैतम बुध्दांचा धर्म या भडव्यांनी विचार परिवर्ताने नाही संपवला. या देशात लाखो बाैध्दांच्या कत्तली केल्या. जो धर्म, जो बुध्द अर्धे अधिक जग स्विकारते तोच धर्म आणि तोच बुध्द भारताच्या मातीतून अल्पसंख्य होतो याचे कारण काय ? याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. म्हणूनच एक एक माणूस जपला पाहिजे. विचारांची लढाई विचारनेच लढता येते. अविचाराची लढाई विचाराने लढताही येत नाही आणि जिंकताही येत नाही. विचारांचा किंवा प्रभावाचा विचार केला  असता तर इथला, या मातीतला बुध्द व त्यांचा धम्म वैदिकांना कधीच संपवता आला नसता. या भडव्यांनी कत्तली करूनच तो संपवला. यांचा विचार प्रभावी नव्हता म्हणूनच त्यांना बाैध्दांच्या कत्तली कराव्या लागल्या. बाैध्द स्तुप पाडावे लागले, फोडावे लागले. अफगाणिस्तानात तिथल्या कट्टर मुस्लिमांनी बाैध्द मुर्त्या फोडल्याचे हे  सांगतात पण भारताच्या मातीत या भडव्यांनी वैदिक धर्माच्या वर्चस्वासाठी किती माणसं मारली ? किती स्तुप फोडले ? याचा हिशोब देतील काय ? म्हणूनच अविचाराच्या लढाईला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार प्रमाण माणणा-या लोकांनी सगळे मतभेद मातीत गाडून एक व्हायला पाहिजे. या क्रुर व कपटी जातीयवाद्यांना एकसंघपणे आव्हान द्यायला पाहिजे. संभाजी ब्रिगेडने मतभेद विसरून आपले तुकडे परत शिवले पाहिजेत. पुन्हा एकसंघ होत संघर्षाचा एल्गार केला पाहिजे. कारण ही लढाई केवळ विचारांची लढाई उरलेली नाही तर ती अस्तित्वाची लढाई आहे. सत्तेने बेफाट व बेफाम झालेल्या मस्तवाल सत्ताधा-यांच्या वेळप्रसंगी गचांडीला पकडावे लागले तर पकडावे लागेल आणि या प्रवृत्तींना धडा शिकवावा लागेल. नाहीतर रोज एकाला मारतील, जीवंत गाडतील. निषेध करायलाही लोक शिल्लक उरणार नाहीत.

दत्तकुमार खंडागळे  संपादक वज्रधारी, मो.9561551006

###################

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या