11 ऑगस्ट रोजी एन यु बी सी चे संस्थापक स्व. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांची 11 ऑगस्ट रोजी 32 वी पुण्यतिथी

 

11 ऑगस्ट रोजी एन यु बी सी चे संस्थापक स्व. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांची 11 ऑगस्ट रोजी 32 वी पुण्यतिथी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 3/8/2025 : राष्ट्रीय पिछडा वर्ग, अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यंक महासंघ अर्थात एन. यु. बी. सी. चे संस्थापक  चौधरी ब्रह्मप्रकाश (माजी मुख्यमंत्री दिल्ली, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार) यांची 32 वी पुण्यतिथी दिनांक 11 ऑगस्ट रोजी देशभर साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी संपन्न झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये विचार विनिमय झाला असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितली.

11 ऑगस्ट रोजी प्रत्येक राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील एनयूबीसीचे सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये संस्थापकांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून आदरांजली अर्पण करतील.

ऑनलाइन मीटिंगमध्ये एनयूबीसीच्या राष्ट्रीय अध्यक्षा एस गीता, वेस्टर्न भारत अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष हरनाम सिंह यादव, सेक्रेटरी आशिष कारखानीस, झोनल प्रेसिडेंट  राजपाल मीना, इत्यादींनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या