🔵 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/7/2025 :
आपण अनेकदा खरेपणाने वागत असताना आपल्याला वेगळाच अनुभव येतो. आपला सच्चेपणा इतरांना त्रासदायक होतो. त्यांची पोल खोल होते किंवा आपल्याला मिळणारा मोठेपणा त्यांना सहन होत नाही.
अशावेळेस आपलेच मित्र म्हणवणारे आपल्याला खाली कसे खेचता येईल, आपली मानहानी कशी होईल, आपल्याला शिक्षा कशी होईल असे पहात असतात. खोटेनाटे आरोप करून घरी आपल्या पालकांपर्यंत जातात.
मुलांनो, स्वतः वर विश्वास ठेवा. आपले वागणे-बोलणे यावर आपल्या शिक्षकांचा व पालकांचा विश्वास असेल तर आपले कोणी काही वाईट करू शकत नाही. जे आपले वाईट करू इच्छितात तेच तोंडघशी पडतील.
कोणीही आपल्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तरी दुर्लक्ष करा. उशिरा का होईना तुमची किंमत त्यांना कळेल.
जयहिंद!🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या