विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 22/7/2025 : आपण समाजात वावरत असताना आपल्याला बेजबदार पद्धतीने वागणाऱ्या लोकांचा बऱ्याचदा त्रास होतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा करणे, बेशिस्त वाहने चालवणे, नियम न पाळणे आणि बरेच काही...

या सर्व (वाईट)सवयी एक दिवसात लागत नाहीत आणि सुटत देखील नाहीत. यामुळे आपण आपल्या सवयींविषयी जागरूक राहिले पाहिजे. अगदी लहानपणापासूनच चांगल्या सवयी, मग त्या वैयक्तिक असोत अथवा सार्वजनिक असोत अंगीकारल्या पाहिजेत.

योग्य वेळी केलेला चांगल्या सवयींचा अंगीकार तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून घडविण्यास नक्कीच पूरक ठरतील.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या