गिरीशकुमार विठ्ठल शिंदे यांची शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघावर नियुक्ती

 


गिरीशकुमार विठ्ठल शिंदे यांची शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघावर नियुक्ती

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 13/07/2025 : गिरीशकुमार विठ्ठल शिंदे (रा. बागेचीवाडी - नऊचारी - अकलूज ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांची शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघावर कोकण विभाग संपर्कप्रमुख, सदस्य पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा कार्यकारिणी समिती, या पदावर नियुक्ती करण्यात आली.शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ चे महाराष्ट्र राज्य. प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सदर पदांसाठी गिरीशकुमार विठ्ठल शिंदे  यांच्या नावाची शिफारस महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या हस्ते आणि महासंघाचे उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या उपस्थितीत डॉ.गिरीशकुमार शिंदे  यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ ही भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय शेतकरी संघटना असून  अत्यंत उल्लेखनीय काम करीत आहे. गिरीशकुमार विठ्ठल शिंदे यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या