विचारधारा

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 04/07/2025 :

आपल्याला जे दोन हात आहेत, ते फक्त खाण्यासाठी नाहीत. त्या दोन हातांनी आपण काम करू शकतो, लिखाण करतो, ओझी उचलतो आणि बरेच काही.

पण इतक्यावरच न थांबता आपण आपले हात जास्त देखणे कसे होतील हे पाहिले पाहिजे. कोणतेही काम करताना ते जास्तीत जास्त चांगले कसे होईल याची काळजी घेतली पाहिजे. बोटांनी चितारलेले चित्र असो  वा गुंफलेला हार त्यामधील कलात्मकता महत्वाची.

मुलांनो, चिखलातून, दगडातून तयार केलेल्या मूर्ती, कलात्मक बांधकामे, बियाणे पेरून आलेली डौलदार पिके किंवा फुलवलेली फळबाग. निर्मितीचा आनंदच काही वेगळा.

आपले हात विनाशासाठी नको तर निर्मितीमध्ये गुंतवा व त्यांना देखणे करा.

जयहिंद!🇮🇳

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या