माजी खासदार, सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी अकलूज वैभव न्यूज नेटवर्क वृत्त एकसत्ता न्यूज आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. दिनांक 23/06/2025 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती प्रशाला समितीचे सदस्य रणजित माने- देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक अमोल फुले , उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या दहावी ब वर्गाने वर्गशिक्षिका सौ झगडे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले. याप्रसंगी विद्यार्थिनी कु. आम्रपाली सूत्रावे हिने माजी खासदार स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक, क्रीडा, शेती आदी क्षेत्रासह जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली वाघ व कु. संचिता मोरे यांनी केले. यास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार कु. आयमन बागवान हिने मानले.

माजी खासदार, सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 23/06/2025 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती प्रशाला समितीचे सदस्य रणजित माने- देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक अमोल फुले , उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

 यावेळी विद्यालयाच्या दहावी ब  वर्गाने वर्गशिक्षिका सौ झगडे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे  नियोजन पार पाडले.

याप्रसंगी विद्यार्थिनी कु. आम्रपाली सूत्रावे हिने माजी खासदार स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक, क्रीडा, शेती आदी क्षेत्रासह जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली वाघ व कु. संचिता मोरे यांनी केले. यास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार कु. आयमन बागवान हिने मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या