🟪 गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 29/5/2025 :
1971 साली राजेश खन्नाचा मर्यादा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये "गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा" हे गाणे किशोर कुमारने गायले होते. त्या जमान्यात हे गाणे फार गाजलेले होते. हे गाणे आज मला आठवण्याचे कारण म्हणजे पहेलगाम हल्ला व त्यानंतरची सिंदूर कारवाई.
यानंतर आपल्या देशात सर्वसामान्य जनतेला अभिमान वाटेल असा पराक्रम सैन्याने व केंद्र सरकारतील कूट नितीने केला. पण ज्यांच्या मनात मोदी व भाजप द्वेष भरलेला आहे त्यांनी मात्र या सैन्याच्या भिम पराक्रमाबद्दल सैन्याचे अभिनंदन न करता निरनिराळी विधाने करून आपली नीती दाखवून दिली आहे.
सुमारे साठ वर्षांपूर्वी दावणगिरीच्या एका फॅक्टरीत असणारे कामगार पुढारी काँग्रेसमध्ये जाऊन आज ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांनी "ऑपरेशन सिंधूर ही चूट पुट घटना आहे" असे उद्गार काढले आहेत. अनेक काँग्रेस नेते व काही विरोधी पक्षाचे नेते यांनी तर या निमित्याने बरीच मुक्ताफळे उधळली आहेत.
आता आपण ऑपरेशन सिंदुरचा लेखाजोखा पाहू या
22 एप्रिल ला दहशतवादी यांनी केलेल्या हल्ल्यात नक्कीच आपले सत्तावीस निष्पाप नागरिक मारले गेले. हा आपला राष्ट्रीय अअपमान होता व ज्यांच्या घरातील पुरुष मंडळी मारली गेली त्यांचे तर कशानेही न भरून येणारे नुकसान झालेले आहे.
प्रतिशोध
पण या हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून आपल्या केंद्र सरकारने सैन्यामार्फत जे ऑपरेशन सिंदूर राबवले त्याचा ठळक परीणाम पुढील प्रमाणे
1) नऊ ठिकाणी असणारे 21 दहशतवाद्यांचे ठिकाणी नेस्तनाबूत करण्यात आले.
2)या ठिकाणी असणारे शंभरहून अधिक दहशतवादी यांना यमसदनी पाठविण्यात आले.
3)पाकिस्तानचे 10 (विमानतळ) एअर बेस नष्ट करण्यात आले.
4)पाकिस्तानच्या छुप्या परमाणु केंद्रावर मिसाईल टाकण्यात आली.
5)पाकिस्तानची पाच विमाने नष्ट झाली.
6) पाकिस्तानने पाठवलेले 600 ड्रोन नष्ट करण्यात आले.
7)त्यांचे अनेक मिसाईल हवेतच नष्ट केले परमाणुबॉम्बचा पायलट बॉम्ब नष्ट करण्यात आला.
8) सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला.
9)पाकिस्तानला मिळणारे कर्ज थोपवण्यात आली.
10)चिनी व अमेरिकी बनावटीची शस्त्रास्त्रे रिकामी आहेत हे सिद्ध झाले.
11)राफेल खरेदीची सफलता सिध्द झाली.
12)भारतात तयार होणाऱ्या शस्त्रांना जगातून प्रचंड मागणी वाढली.
13) तुर्कस्तान सोडल्यास एकही देश पाकिस्तानच्या पाठीशी राहिला नाही.
कूटनीती द्वारे व पराक्रमाद्वारे पाकिस्तानला सैरभैर करून टाकले.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या म्हणण्याप्रमाणे चुटपुट कारवाई असेल तर ही चुटपुट कारवाई किती भयंकर होती हे फक्त पाकिस्तानला जाणवत आहे.
म्हणून शिर्षकात नमूद केलेल्या सिने गीतामधील गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा या धर्तीवरील चुटपुट कारवाई इतकी भयंकर असेल तर भयंकर कारवाई कशी असेल हे पाकिस्तान धार्जीण्या भारतीय नेत्यांनी विचार करण्यासारखे आहे.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी.
0 टिप्पण्या