🟩 शेतकऱ्यांना मिळू शकतो उसाला 4950.8 रू प्रती टन भाव (साखरेला द्विस्तरीय भाव)
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 31/5/2025 : भावानिक नाही वैचारिक, परसेप्शन नाही, कॅलक्यूलेशनस!
दि. 31 ऑक्टोबर 2022 च्या आमच्या कॅलक्युलेशन्स - सूत्रा प्रमाणे शेतकऱ्यांना उसाला 4950.8 रू प्रती टन भाव मिळू शकतो. आजच्या परिस्थितीत तर त्याहुन जास्त मिळेल. जर साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला सर्वांनाच खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो.
शेतकऱ्यांना मिळणारा भावः 4950.8 रू. प्रती टन
एका साखर कारखान्याला होणारा फायदाः 262.2 कोटी रू.
सरकारला मिळणाऱ्या महसुल मधील वाढः 26,272 कोटी रू. प्रती वर्ष
आपले खरे शत्रू साखर कारखाने नाहीत तर इतर उद्योग आहेत जसे शीतपेय, कॕडबरी, मिठाई, मद्य, औषधे, शीतपेये, बियर, आईसक्रीम, बिस्कीट, केक, चॉकलेट, मिठाई वगैरे बनवणारे आहेत, जे साखरेवर प्रक्रिया करून 400 टक्केच्या वर नफा कमावत आहेत
तसेच एका कुटुंबाला महीन्याला तीन किलो साखर लागत असल्यामुळे 27 रू. / महीना जास्त झाल्यामुळे त्यांचे स्वयंपाकघराचे अर्थकारण काही कोलमडणार नाही.
कसा व किती हे खालील कॅलक्युलेशन्स मध्ये मांडले आहे.
आम्ही फक्त मागणीच केली नाही तर अंमलबजावणी कशी करता येईल त्याची तपशीलावर मांडणी केली आहे, दुसऱ्या एका लेखात.
साखरेला द्विस्तरीय (औद्योगिक व घरगुती) भाव देण्याच्या आपल्या सुचनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपले शिष्ट मंडळ मुरलीधर मोहळ, केंद्रीय राज्य सहकार मंत्री ह्यांची भेट घेणार आहे.
शेतकरी, कार्यकर्ते, संघटना, साखर कारखाने व त्यांच्याशी संलग्नित संस्थानी ह्या मागणीचा पाठपुरावा करावा.
सतीश देशमुख, पुणे
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
समन्वयक, टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी
0 टिप्पण्या