संपादकीय पान.............
मुर्शिदाबाद दंगलीचे बौद्धिक !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
मुंबई दिनांक 20/04/2025 :
कॉंग्रेस पक्षाचा उल्लेख मी हडळ म्हणून करतो आणि ती हडळच आहे याबद्दल माझ्या मनात संशय नाही. मी कोंग्रेसचा प्रचंड तिरस्कार करत असलो तरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी नावाची मूर्ख माणसे कोंग्रेसचा कारभार पाहायला सुरुवात करण्यापूर्वीची कोंग्रेस समतोल साधणे या पद्धतीने काम करणारी होती.
मुस्लिम तुष्टीकरण करायचेच पण तरीही समतोल साधायचा आणि आपला फायदा करून घ्यायचा हे धोरण असे.
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना याला जन्माला आल्यापासून त्याचे लालन , पालन , पोषण , हट्ट पुरवणे हे सगळे कोंग्रेसने पडद्याआड राहून केले आहे.
शिवसेना ही हिंदूंच्या प्रेशर कुकरची शिट्टी होती. जी कोंडलेली वाफ बाहेर काढत असे.
कोंग्रेसने मुस्लिम तुष्टीकरण करायचे , शिवसेनेने शड्डू ठोकायचा कोंग्रेसने दोन पाऊले मागे यायचे.
यात कोंग्रेसचा फायदा मुस्लिमांना आम्हीच तुमचे तारणहार हे पटवून देता येते आणि त्यांची गठ्ठा मते सुरक्षित रहातात. हिंदूंच्या दडपणामुळे आम्ही माघार घेतो हे दाखवून देत नेमस्त हिंदूंना आपल्याकडे बांधून ठेवता येते . आक्रस्ताळ्या हिंदूंना सुद्धा व्यासपीठ मिळते आणि मर्यादित का होईना यश मिळते आणि त्यामुळे ते खुश रहातात.
आणि एकंदर समतोल साधला जातो.
या सगळ्या घटनाक्रमातून आर्थिक लाभ उपटणे हा जो प्रकार असायचा तो लूट वाटून घ्यावी या पद्धतीने कोंग्रेस कडे सिंहाचा वाटा आणि शिवसेनेकडे अल्प वाटा या पद्धतीने वाटप सुद्धा व्हायचे.
पाकिस्तान विरुद्ध लोक भावना क्षुब्ध आहेत.. मग शिवसेनेने खेळपट्टी उखडायची , राज्यसरकारने लुटुपुटू कारवाई करायची. पण सामने स्थगित होणार. जनमानस खुश...
कश्मीर दहशतवादाने जळत असताना बाळासाहेबांनी हजचे विमान उडू देणार नाही ही घोषणा करायची. केंद्र आणि राज्य सरकारने डोळ्यांवर कातडे ओढायचे.. आणि पंडितांच्या विस्थापनाने संतापलेले हिंदू अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आपली वहिवाट रहाते आहे म्हणून खुश.
दंगल भडकली तर शिवसैनिक रस्त्यावर येऊन हिंदूंची मसल पोवर दाखवायचा. त्यामुळे हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटायचा.
अटल बिहारी वाजपेयी किंवा आडवाणी सुद्धा वेडे नव्हते. त्यांनी राज्यपातळीवरील एकही निवडणूक न लढवलेल्या एका कोंग्रेस फंडेड नेत्याला आपल्या समतूल्य ठेवले. युतीत बाळासाहेब आडवाणी किंवा वाजपेयी ही अंतिम चर्चा व्हायची. त्याचे कारण सुद्धा तेच. आक्रमक हिंदुत्व ही प्रतिमा असणारी शिवसेना ही भाजपाला सुद्धा बर्याच काड्या करून त्यांच्या नावावर ढकलून द्यायला कामाला यायची. कारण संघ किंवा भाजपाने उघड उघड कधीही हिंदूंच्याच हितासाठी वचनबद्ध ही भूमिका कधीही घेतलेली नाही. त्यावेळी पण नाही आणि आजपण नाही.
बाबरी पडावी हे सगळ्यांचेच नियोजन परंतु पडल्यावर वाजपेयी आणि आडवाणी यांनी नकाश्रू ढाळले बाळासाहेबांनी संभ्रमित परंतु जबाबदारी घेणारी भूमिका घेतली. अर्थात जर खरच कोंग्रेस सरकारने कारवाई करायची वेळ आली असती तर शिवसेनेने हे सगळे आपल्या अंगावर घेतले असते आणि शिवसेना कोंग्रेस यांची नाळ जुळली असल्याने शिवसेनेवर फार मोठी कारवाई कोंग्रेस नेत्यांनीच टाळली असती.
इतकी सगळी राजकीय गणिते होती.
परंतु भाजपाने शिवसेनेची दोन शकले करून हिंदूंच्या हितासाठी लुटुपुटीचे भांडण करणारा पक्ष सुद्धा संपवला.
आज त्यामुळे हिंदूंची स्ट्रीट फाईट क्षमता संपली आहे.
उधोजी उघड कॉंग्रेस च्या वळचणीला जाऊन बसले आहेत आणि एकनाथ शिंदे भाजपाच्या संमती शिवाय एकही पाऊल उचलणार नाही.
मुर्शिदाबाद हिंसाचारातून जर समस्त हिंदूंना आणि हिंदू संगठनांना धडा घ्यायचा असेल तर हा सर्वात महत्वाचा धडा आहे की आता भाजपा आणि संघाने आपली ऐतिहासिक चूक सुधारण्याची वेळ आली आहे.
तुम्ही तुमच्यापासून वेगळा , फटकून असणारा परंतु ज्याचे लालन , पालन , पोषण तुम्हीच कराल आणि त्याला एका मर्यादेत मोठे होऊ द्याल असा एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष देशाला प्रदान करणे आवश्यक आहे.
तुमची सत्ता खरच स्थिर व्हावी असे तुम्हाला वाटत असेल , तुम्हाला हिंदू हिताचे कायदे करून आणि त्यांची अंमलबजावणी करून हिंदूंचे हित साधावे असे खरच वाटत असेल तर तुम्ही एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष तातडीने जन्माला घाला.. किंवा जन्माला येत असेल तर त्याला ताकद द्या.
माझ्या या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे अंध भक्त त्यांच्या मर्यादित बौद्धिक कुवतीचे प्रदर्शन करायला येतीलच. पण सामान्य हिंदूंना हा मुद्दा नक्की समजेल.
एक उदाहरण देऊन विषय संपवतो.
क्षणभरासाठी कल्पना करा की मुर्शिदाबाद दंगल होते आहे, कोंग्रेस राज्य आणि केंद्रात सत्तेत आहे आणि बाळासाहेब ठाकरे हयात आहेत.
बाळासाहेबांनी काय घोषणा केली असती ???
पश्चिम बंगाल मधील मुस्लिमांनी माझ्या हिंदू बांधवांवर हल्ला केलाय आम्ही महाराष्ट्रात बंगाली मुसलमान राहू देणार नाही.
दुसर्या दिवशीपासून शिवसैनिकांनी मुंबई , पुणे , नागपूर सगळ्या मोठ्या शहरातील बांधकामाच्या साईट गाठून तिथले बंगाली मुसलमान बडवून काढून त्यांना रेल्वेत भरून पाठवायला सुरुवात केली असती.
शिवसैनिकांनी कलकत्त्याहून महाराष्ट्रात येणार्या रेल्वे महाराष्ट्राच्या सीमेवरच अडवल्या असत्या त्यातील बंगाली मुसलमानांना मारहाण करून परतीच्या गाडीत पाठवून दिले असते.
आता यातील महत्वाचा भाग..............
या सगळ्या प्रक्रियेत दोन्ही ठिकाणची कोंग्रेस सरकारे डोळ्यांवर कातडी ओढून बसली असती. लुटुपुटीची अटक करून कार्यकर्ते सोडून दिले असते.
देशभर याने वातावरण तयार झाले असते ममता बॅनर्जी नरमली असती.
आज काय झाले आहे ???
समस्त कट्टर हिंदुत्ववाद्यांना असे वाफ जाऊ देणारे माध्यमचं उपलब्ध नाही. केंद्र सरकार सुरक्षा दले पाठवून गप्प बसले आहे. त्यांच्याकडून राष्ट्रपति राजवट लावली जाणार नाही हे नक्की झाल्यावर आता ममता बॅनर्जीच कडाडली आहे. की बांगलादेशातून बीएसएफ च्या मदतीने अतिरेकी आणून भाजपाने मुर्शिदाबाद पेटवले.
आणि याचा प्रचार ती बंगाल मध्ये नक्की करणार आणि स्वतःची खुर्ची अजून बळकट करणार.
नुकसान कुणाचे ? भाजपाचे
का ? कारण यामुळे बंगाली हिंदूंचे धैर्य नष्ट होऊन ते ममताला पूर्ण शरण जाणार.
पुढील निवडणुकीत सुद्धा सत्तांतर होण्याची शक्यता दुरावणार...
दुसरे पण भाजपाचे असे नुकसान आहे की देशभरातील कट्टर हिंदू आणि सामान्य हिंदू सुद्धा मुर्शिदाबाद घटनेमुळे व्यथित होऊन मोदींनाच शिव्या घालणार.
भाजपा आणि संघासाठी यातून शिकण्यासारखा धडा म्हणजे
तुम्ही लोकशाही राजवटीत अश्वमेधाचा घोडा सोडू शकत नाही. तुमचे शत्रू वश करून तुम्ही त्यांना मांडलिक केल्याने तुमची शक्ति वाढते हा भ्रम आहे. उलट तुमचे हितचिंतक दुखावतात आणि पर्यायांचा शोध सुरू करतात.
भाजपाचे नशीब आहे की सोनिया आणि राहुल या वेडगळ लोकांच्या हातात पक्ष आहे. दुसर्या कोणत्याही नेतृत्वाच्या हातात पक्ष असता तर तुम्ही 2024 ला सत्तेत आला नसता.
सध्या तुम्हाला पर्याय नाही आणि म्हणून तुम्ही माज करत आहात... पण याच्या ऐवजी डोके जागेवर ठेवून एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जन्माला घाला...
अजित दादा पवार सारखी बांडगुळे आणि त्याच्या जोडीला मिटकरी भूजबळ यांच्या सारखा कचरा न पोसता तुम्हाला सत्ता भोगता येईल आणि कट्टर हिंदुत्ववादी पक्ष नावाची प्रेशर कुकर शिट्टी वापरत हिंदू हिताचे कायदे करता येतील.
भाजपाला कॉंग्रेस संपूर्ण आकाश व्यापायचे आहे. त्याचा मार्ग नेभळट वागणे , मुसलमानांचे तुष्टीकरण आणि अजित पवार सारखे महाभ्रष्ट कवटाळणे हा नसून एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष उभा करून त्याची भीती मुसलमानांना घालत आपला पाया रुंदावणे हा आहे.
मुसलमान जो सत्ताधारी आहे त्याला वश असतो. ते सत्तेशी पंगे घेत नाहीत. पण तुम्ही सत्ताधीश आहात असे गेल्या 10 वर्षात वागूच शकला नाहीत हे सुद्धा तुमचे अपयश आहे. तुमची सबका विकास , सबका विश्वास , एक डी एन ए ही भाषा त्यांच्या डोक्यात घुसत नाही. या सगळ्याच्या जोडीला हग्यामार देण्याची तुमची क्षमता त्यांना तुमच्याशी बद्ध ठेवू शकते.
नागपूर दंगल , नाशिक दंगल मध्ये जर पोलिसांना मोकळा हात दिला असता आणि नंतर सुद्धा बेकायदेशीर वस्त्या धुंडाळून नडगी सडकून काढली असती तर तुम्हाला मुसलमान शरण आलेले दिसले असते. तुम्ही पोलिसांचे हात बांधले आता ते प्रत्येक वेळी पोलिसांवर हल्ला करणार आणि याचा सर्वात जास्त नकारात्मक परिणाम हिंदूंवर होणार , देशाचा कायदा आपले रक्षण करू शकत नाही. भाजपा पोलिसांचेच रक्षण करू शकत नसेल, त्यांना तो दंगेखोरांवर तुटून पडायचा आदेश देऊ शकत नसेल तर तो आपले रक्षण काय करणार ? हा नकारात्मक विचार प्रबळ होऊ शकतो. किंबहुना होतो आहे.
आमच्याकडे 237 आमदार आहेत आणि आमचे सरकार स्थिर आहे या भ्रमातून बाहेर पडा. एक राज्यकर्ता म्हणून सुद्धा तुमची काही घटनादत्त कर्तव्ये आहेत त्याचे निर्वहन करा.
राज्यकर्ता हा न्यायनिष्ठूर असला पाहिजे. हा "न्यायनिष्ठुर" शब्द तीन वेळा वाचा. तुम्ही तसे नाहीत आणि हा दोषच आहे.
तळटीप -
जगतात कुठेही पोकळी कायम रहात नाही.. आज संपूर्ण देशात कट्टर हिंदुत्ववादी पक्ष नाही ही पोकळी निश्चित आहे. ही पोकळी संघ आणि भाजपाने स्वतः भरून काढली आणि एक पक्ष उभा केला तर उत्तम होईल.
पण त्यांनी हे केले नाही तरी हे नक्की घडेल असा मला विश्वास आहे. कारण "जितका काळोख दाट असतो तितक्याच ताकदीने सौदामिनी प्रकट होते".
सुजीत भोगले.
0 टिप्पण्या