"सांगली जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवण्याचे काम विक्रम यादव करत आहे" - जिल्हाधिकारी अशोक काकडे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/04/2025 : "सांगली जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवण्याचे काम तासगांवचा युवक विक्रम यादव करत आहे". असे गौरव उदगार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले. विक्रम यादव यांनी नुकतेच एका गर्भवती महिलेसाठी अतिशय दुर्मिळ असणारे बॉम्बे बल्ड ग्रुपचे रक्तदान करून प्राण वाचविले होते त्याबद्दल आज सागंली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की यादव यांनी अतिशय दुर्मिळ अशा "बॉम्बे बल्ड ग्रुप" चे ६५ वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविले आहेत. त्यांनी देशा बरोबर परदेशातील लोकांच्या साठी ही रक्तदान केले आहे. त्याच्या कार्याची दखल सांगली जिल्ह्याच्या इतिहासात कायम राहिल.
"बॉम्बे बल्ड ग्रुप" हा एक रक्तगट असुन या रक्त गटाचे संपुर्ण भारत देशात केवळ १७९ लोक आहेत. तर संपुर्ण जगात केवळ ४२० लोक आहेत. त्यांना या रक्त गटाचे रक्त लागते. आशी माहिती यादव यांनी यावेळी दिली. बॉम्बे बल्ड ग्रुप या रक्त गटाचा शोध १९५२ साली मुंबई येथे लागला होता. त्यावेळी मुंबईला बॉम्बे म्हणुन ओळखले जात होते. त्यावरूनच या रक्तगटाचे नांव "बॉम्बे ब्लड ग्रुप" असे ठेवण्यात आले आहे.
या सत्कार प्रसंगी माजी आ. पृथ्वीराज देशमुख, सुमित कदम, सुरेंद्र चौगुले, महेश चौगुले, विनोद धोतरे, व अभिजीत बुधले उपस्थित होते.
1 टिप्पण्या
रक्तदान जिवनदान
उत्तर द्याहटवा