सौ. सीताबाई विठ्ठल नायकुडे यांचे हृदयविकाराचे धक्क्याने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 07/03/2025 : मायाक्का कॉलनी, नायकुडे वस्ती,संग्रामनगर-अकलूज येथील रहिवासी सौ.सीताबाई विठ्ठल नायकुडे(वय 67 वर्षे) यांचे आज शुक्रवार दि.7 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास राहते घरी हृदयविकाराचे धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.सौ. सीताबाई विठ्ठल नायकुडे या अत्यंत धार्मिक स्वभावाच्या आणि मनमिळाऊ वृत्तीच्या होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नायकुडे वस्ती येथील शेतात त्यांचे पार्थिवावर अंतिम दाह संस्कार करण्यात येणार आहेत.

0 टिप्पण्या