पत्रकार सोमनाथ खंडागळे यांची "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या" सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा फेर निवड

पत्रकार सोमनाथ खंडागळे  यांची "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या" सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा फेर निवड 

वृत्त एकसत्ता न्यूज

नवी दिल्ली येथून 

भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे

11/02/2025 : पत्रकार सोमनाथ खंडागळे  यांची "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या" सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.

 सोमनाथ खंडागळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून मागील कार्यकाळात उत्तम कामगिरी बजावली असल्याने संघटनेने त्यांची फेर निवड केली आहे. सोमनाथ खंडागळे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, पी जी कोटूरवार, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट,ॲड.रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव,राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार,विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली आहे. पुढील वाटचालीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी शुभेच्छा दिल्या.

"आपण जिल्हाध्यक्ष पदाला सन्मानित केले"

"आपल्या पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आणि जिल्हाध्यक्ष पदाला सन्मान प्राप्त करून दिला . त्यामुळेच सलग चौथ्यावर्षीही जिल्हाध्यक्षपदी आआपलीच फेर निवड झालेली आहे ही खरोखरच अभिमानास्पद बाब होय. आपल्या या गौरवस्पद निवडीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि आपले सार्थ निवड केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे यांना धन्यवाद देत आहे देत आहे" - भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे. ( राष्ट्रीय चेअरमन ,वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय सल्लागार समिती)

 भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव तसेच नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली व शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे महाराष्ट्र  प्रदेश संपर्क प्रमुख व प्रसिद्धीप्रमुख  भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (सेवाजेष्ठ पत्रकार) यांनी नवी दिल्ली येथून भ्रमणध्वनीवरून जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या