बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 8 जानेवारी 2025 : सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सोलापूर यांच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात बाळासाहेब आप्पासाहेब मगर (निमगाव म., तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचा पक्ष एकनिष्ठतेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्या निमित्ताने रमेश नामदास यांच्या वतीने मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सरपंच सुभाष साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाळासाहेब मगर यांचे निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी समाधान वसंत मगर, युवक अध्यक्ष रमेश नामदास, निमगाव चे सरपंच सुभाष रामचंद्र साठे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मारुती मगर, सौरभ बाळासाहेब मगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या