नातेपुते नगरपंचायतीचे भ्रष्ट मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची उच्चतरी चौकशी करा..!

 नातेपुते नगरपंचायतीचे भ्रष्ट मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची उच्चतरी चौकशी करा..!

वृत्त एकसत्ता न्यूज

माळशिरस प्रतिनिधी दिनांक 22/01/2025 : सहकार नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून माधव खांडेकर कार्यरत झाल्यापासून या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची व इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. या योजनेतील हप्ता देण्यासाठी लाभार्थ्याकडून हजारो रुपयांची मागणी संबंधित अधिकाऱ्याकडून केली जात आहे. रक्कम त्यांच्या हस्तांकाकडे मिळाले खेरीज हप्ते सोडले जात नाहीत. बेकादेशीर कामासाठी एजन्सी नेमणूक करून त्यांच्या मार्फत आर्थिक उलाढाल केल्या जातात व निविदा टेंडर मध्ये देखील मोठे भ्रष्टाचार होत आहेत. त्यामुळेही ई निविदा टेंडर मध्ये अनियमितता करणे, ठराविक ठेकेदारांना संगनमत करून टेंडर मॅनेज करणे, या ठराविक संगनमत केलेल्या ठेकेदारा व्यतिरिक्त अन्य ठेकेदार यांनी या निविदा सहभागी घेतल्यास त्याने बेकायदेशीर व जाणीवपूर्वक अपात्र ठरवून या निविदा प्रक्रियेतून बाहेर काढल्या जातात व यातून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार केला जात आहे. काही ठराविक कंत्राटी ठेकेदार एजन्सी वारंवार ठेका मॅनेज करून देताना  माधव खांडेकर यांनी ई निविदा प्रक्रियेमध्ये इतर सहभागी झालेले ठेकेदारांना एजन्सींना अपात्र करण्यासाठी अशा प्रकारची बेकाशीरकृत्य मुख्याधिकारी यांच्याकडून केली जात आहे तसेच नातेपुते नगरपंचायत नातेपुते सर्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये देखील मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी निवडणूक खर्चात संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे नातेपुते नगरपंचायत नातेपुते मध्ये मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडून होत असलेले भ्रष्टाचाराची व भ्रष्ट मुख्याधिकारी व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून संबंधिता वर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा आधुनिक लहुजी सेना यांच्या वतीने जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 27/01/2025 रोजी तीव्र स्वरूपात  आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आधुनिक लहुजी सेना संस्थापक अध्यक्षा श्रीमती नगीनाताई सोमनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव तुपसौंदर यांनी जिल्हाधिकारी सोलापुर व जिल्हा प्रशासनाधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर यांना दिले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्यासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या