ग्राहक समिती वर्धापन दिनानिमित्य
गरजूंना उबदार रग वाटप
वृत्त एकसत्ता न्यूज
मोहोळ /प्रतिनिधी दिनांक 25/01/2025 :
मोहोळ : ग्राहक समिती वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ग्राहक समिती तर्फे मोहोळ येथे गरजूंना ऊबदार रगिंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रम राबवित असल्यामुळे ग्राहक समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड, तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, युवक अध्यक्ष नानासाहेब मोरे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आसपाक बागवान, सरचिटणीस सुखदेव राऊत,एसं टी माजी अधिकारी झेंडे बापू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या