💢 उदंड प्रतिसादामध्ये श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे पारायण सोहळा सुरू 🔰 पारायण सोहळ्याचा सातवा दिवस

💢 उदंड प्रतिसादामध्ये श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे पारायण सोहळा सुरू

🔰 पारायण सोहळ्याचा सातवा दिवस

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्रीक्षेत्र सोमेश्वर करंजे येथून भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे)

करंजे (तालुका बारामती) दिनांक 8 डिसेंबर 2024 : उदंड प्रतिसादामध्ये श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे  सुरू असलेल्या पारायण सोहळ्याचा आज सातवा दिवस असून दैनंदिन पहाटेचा काकडा भजन, लघु रुद्राभिषेक, सामुदायिक श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण होऊन संगीत गाथा पारायण सुरू झाले.

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे (तालुका बारामती जिल्हा पुणे) येथे भरघोस प्रतिसादामध्ये सुरू आहे. व्यासपीठ चालक ह भ प सचिन महाराज महामुनी (शस्त्री पाडेगाव) यांची दैनंदिन सेवा यशस्वीपणे सुरू आहे.

*व्यासपीठ चालक ह भ प सचिन महाराज महामुनी (शस्त्री पाडेगाव), हरिपाठ कीर्तन साथ :  मृदुंगनाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी (मृदुंग विशारद, पांडुरंग महाराज शिंदे)  हभप निखिल महाराज कदम व सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ किर्तनास साथ करीत आहेत.मृदुंगमणी:ऋतिक महाराज पवार (चोपडज),सचिन महामुनी शस्त्री (पाडेगाव),सचिन महाराज भांडवलकर. गायनाचार्य: संतोष महाराज माने कुंडलिक महाराज मिरासे (आळंदी),नरसिंग महाराज राजगुरू,निखिल महाराज कदम,राजेंद्र महाराज भांडवलकर, आकाश महाराज जगताप. *चोपदार:गोविंद महाराज भांडवलकर, मानसिंग महाराज भोसले. हार्मोनियम : मच्छिंद्र महाराज नागरगोजे मोराळवाडी. *मार्गदर्शक :राजेंद्र दादा सोळसकर (बारामती) श्री दत्तात्रय भोसले गुरुजी (कोऱ्हाळे) ह भ प प्रल्हाद देशमुख, निखिल कदम, प्रकाश मोकाशी,(मा. सरपंच करंजे)* *व्यवस्थापन : श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे सर्व सभासद पुजारी मंडळ. स्पिकर मंडप व्यवस्था:विजय कोळपे मंडप स्पिकर्स साऊंड सर्व्हिस. विणेकरी :  ह भ प बाळासाहेब निकम महाराज (सस्तेवाडी).*संपुर्ण आठ दिवस चहापान खर्च:श्री खर्च  बाळकृष्ण शंकरराव खलाटे राहणार खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा. संपुर्ण आठ दिवस हार फुले:विजय साळवा कोळपे करंजे पूल.विशेष सहकार्य:सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व रुद्र प्रतिष्ठान तरुण मंडळ सोमेश्वर मंदिर करंजे, करंजे वारकरी सेवा संघ बारामती तालुका.कार्यक्रम पत्रिका सौजन्य : श्री गणेश मंदिर देवस्थान, मेडद- मोरयानगर तर्फे निकिता कार्ड्स बारामती  सतीश गावडे*

सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे सुरू असलेल्या पारायण सप्ताह सोहळ्यास गत सहा दिवसांपासून भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. पारायण सोहळ्याचे हे पहिले वर्ष असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने भक्त भाविकांमध्ये आणि संयोजकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष पहावयास मिळाले.

सहा दिवसांमध्ये गत सहा दिवसांमध्ये हभप संजय महाराज वाबळे, ह भ प हरि महाराज नामदास, ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे, ह भ प बापू महाराज टेंगले,  ह भ प महादेव महाराज राऊत, ह भ प अमय महाराज शिंदे या  कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा श्री चरणी यशस्वीपणे अर्पण केली आहे.

आज रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी सातव्या दिवसाचे कीर्तन मालेतील पुष्प ह भ प तुकाराम महाराज शास्त्री मुंडे बीड हे दैनंदिन कार्यक्रमानुसार सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गुंफणार आहेत. हा सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण तन मन धन रूपाने आपापल्या परीने अधिकाधिक परिश्रम घेत आहेत.

या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या नंतर एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य स्वरूपातील किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार  असल्याचे, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटीज दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ दिल्ली चे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्याशी संवाद साधताना  सप्ताह कमिटी व अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था हभप पांडुरंग शिंदे महाराज यांनी देवस्थानचे सदस्य, सभासद, संयोजक कमिटी आणि नागरिकांच्या वतीने सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या