💢 श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे
श्रीं ची दिंडी प्रदक्षिणा संपन्न
🔰 आज सकाळी साडेनऊ वाजता ह भ प श्यामसुंदर महाराज ढवळे यांचे काल्याचे किर्तन
वृत्त एकसत्ता न्यूज
( श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे येथून भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे)
सोमेश्वर करंजे दिनांक 9 डिसेंबर 2024 : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे सुरू असलेल्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण व सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाच्या पूर्वसंध्येला श्रीं ची दिंडी प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी सप्ताह सभामंडपातील सजविलेल्या पालखीमध्ये श्रीं चा मानाचा मुखवटा आणि गाथा यांचे विधीवत पूजन करण्यात आले. नंतर टाळ मृदुंग आणि श्रीं च्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ झाला. शिवभक्त प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांना यावेळी सर्वप्रथम श्रीं च्या पालखी चा मान मिळाला. सप्ताह सभामंडपातून वाजत गाजत श्रींच्या दिंडीतील पालखी देवस्थानाच्या सभा मंडपातील नंदी समोर ठेवून मान देण्यात आला तेथून पालखी मंदिर दिंडी प्रदक्षिणेस निघाली. जागोजागी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सायंकाळी नियोजित वेळी ह भ प तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांनी सातव्या दिवसाचे कीर्तन मालेतील कीर्तन पुष्प गुंफले.
आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता ह भ प शामसुंदर महाराज ढवळे (दौंड) यांचे काल्याचे किर्तन सुरू होत आहे. सप्ताह सांगता समारंभीय काल्याच्या कीर्तनास अलोट गर्दीची प्रचिती येईल असे जाणकारातून मत व्यक्त होत आहे. संयोजन कमिटीच्या वतीने सर्व नियोजन अत्यंत चोखपणे राबविण्यात आल्यामुळे उपस्थित भक्त भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. काल्याचा महाप्रसाद ऋषिकेश (काका) नंदकुमार घोलप व धन्यकुमार बाबासो मोकाशी करंजे यांचे तर्फे होत आहे.





0 टिप्पण्या