श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे सफला एकादशीनिमित्त श्री सोमेश्वर भजनी मंडळ तांदुळवाडी यांची सेवा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25 डिसेंबर 2024 : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे ( तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथे "सफला एकादशी" निमित्त 26 डिसेंबर रोजी श्री सोमेश्वर भजनी मंडळ तांदुळवाडी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर )यांची श्री सोमनाथ विनवण्या आणि भजनी सेवा आयोजित केली आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे व महापूजा सौजन्य शिवभक्त हनुमंत दशरथ नवले (जिंती, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यांचे आहे.
" द्वापार युगापासूनचे स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र ख्यातनाम ठरलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे ला "प्रति सोरटी सोमनाथ" म्हणून भक्त भाविकांच्या हृदयामध्ये स्थान आहे. येथील महिमा सर्वदूर प्रसिद्ध आहे आणि अशा महत्वपूर्ण देवस्थान चरणी विनवण्या व भजनी सेवेचा मान मिळणे म्हणजे आमचे फार मोठे भाग्यच आहे" असे या निमित्ताने श्री सोमेश्वर भजनी मंडळ तांदूळवाडी चे ह भ प किसनराव महाराज गायकवाड आणि सोमेश्वर स्थानकाचे प्रचारक भाग्यवंत नायकुडे व सहकारी शिवभक्तांनी म्हटले आहे.
सफला एकादशीनिमित्त गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते 8:30 वा. श्री सोमेश्वर भजनी मंडळ तांदळवाडी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) यांच्या श्री सोमनाथ विनवण्या आणि भजनी सेवा, रात्रौ 9 वा. श्रींची आरती, रात्री 9 नंतर संत पंगत होईल.
या धार्मिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भजनी मंडळ चोपडज, वाकी, करंजे, करंजे पूल, चौधरवाडी, मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहील.
प्रत्येक एकादशीला श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे व वारकरी सेवा संघ बारामती यांच्या सौजन्याने कीर्तन, प्रवचन, भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी सेवा देण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी मोहन काका भांडवलकर (99 60 95 15 00 /96 23 35 21 11), भाऊसाहेब भांडवलकर (76 20 44 74 45), बाळासाहेब विश्वनाथ भांडवलकर (76 20 900 220), हेमंत बबनराव भांडवलकर (97 64 15 48 56), भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (98 60 95 97 64) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या