"आत्मक्लेष कसले करता, आत्मपरीक्षण करा"
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 2/12/2024 :
या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा प्रचंड विजय हा अनेक डाव्या विचारसरणीच्या चीतातूर जंतूंचा छाती पिटण्याचा विषय झाला आहे. डॉक्टर बाबा आढाव कुमार सप्तर्षी असे अनेक फुरोगामी तथाकथित विचारवंत की ज्यांना त्यांच्या जवळचे लोक सुद्धा विसरले आहेत व विचारत नाहीत. त्यांना अचानक जाणता राजा यांच्याकडून प्रमोशन मिळून ते आता आत्मक्लेष करू लागले आहेत.
आपणास कदाचित आठवत असेल राष्ट्र सेवा दल ,प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष याचे एक काळ महाराष्ट्रात मोठे वजन होते अनेक त्यागी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात समाजवादी चळवळ नावारूपास आणली होती पण व्यक्तिगत अहंकार व खोट्या कल्पना यातून ही चळवळ मागे पडत गेली याचे कारण यांनी निरनिराळी पीठे स्थापन केली व हे पीठाधीश आयते मलिदा खात राहून गेले यामुळे चळवळीत नवीन कार्यकर्त्यांची भरती बंद पडली ज्याप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा एक वृद्धाश्रम झाला त्याप्रमाणे ही समाजवादी चळवळ सुद्धा वृद्धाश्रम झाली कारण खोटे अहंकार खोट्या कल्पना व खोटी विचारसरणी फार दिवस चालत नाही हे त्यांच्या अद्यापही लक्षात आले नाही.
19 80 साली इंदिराजी गांधी पुन्हा सत्तेचा आल्यावर त्यांनी विचारपूर्वक डाव्या चळवळीला जवळ केले व त्यांना हवे तसे निधी उपलब्ध करून दिले तसेच परकीय निधी त्यांना मिळण्यात अडचणी दूर केल्या. त्यामुळे पै पै गोळा करून संघटना चालवायची हे लोक विसरून गेले व त्यांनी त्यांच्या संस्था ह्या आपल्या विश्रांतीच्या व मलीदा खाण्याच्या साठी वापरल्या. नवीन कार्यकर्त्यांना जोडावे त्यांना आपला विचार सांगावा त्यांना त्याग शिकवावा हे सर्व समाजवादी पुढारी विसरून गेले.
मोहन धारिया चंद्रशेखर याच्यापासून गावगल्लीतील फुढारी काॅग्रेंसच्या दावणीस बांधून घेण्यात घन्यता मानू लागले. केवळ हिंदूत्व व संघ याला विरोध म्हणजे आपले इती कर्तव्यता असे समजून हे सर्व समाजवादी जगत आले.
एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज एस एम जोशी ना ग गोरे या सर्व महान व्यक्तींच्या व कार्य यावर आपली सुखाची पोळी भाजत हे सर्व दुय्यम दर्जाचे कार्यकर्ते दंग राहिले त्यातून कधी संसदेत इंदिरा गांधीला पाठिंबा द्यायचा तर कधी विधानसभेत काँग्रेसची पाठराखण करायची यातून
*सुखाला चटवले व संघर्षाला मुकले
संघर्ष हा विषय त्यांनी आपल्या शब्दकोशातून काढून टाकला व केवळ पत्रक बाजी ,लेख लिहिणे तर्कदृष्ट विचार मांडणे व खोट्या क्रांतीच्या कल्पना उराशी बाळगून आपण सर्व समाजाचे नेतृत्व करीत आहोत अशा दिवास्वप्नात राहणे
हे लोक त्यांच्या आयुष्यभर संघ व त्यांच्या शाखा याचा द्वेष करत राहिले पण राष्ट्रसेवा दलाच्या शाखा बंद पडल्या ,काम बंद पडले याकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले
काँग्रेसवाल्यांनी टाकलेल्या तुकड्यावर आपल्या निरनिराळ्या संस्था चालवणे व त्यावर आपल्या दैनंदिन गरजा भागवणे यावरच ही मंडळी दिवस आनंदात काढत आले आहेत
त्यांनी असा विचार करावा
महाराष्ट्रात ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत त्यांचे लोकप्रतिनिधींचे शतक तरो त्यांना गाठता येते का?
जनतेशी, समाजाशी यांची नाळ तुटली आहे
आंदोलन ,उपोषण ,संघर्ष हे सर्व शब्द ते विसरले आहेत संघटन, त्याग यांच्या स्वप्नातही राहिले नाही हे असे का झाले याचे आत्म परीक्षण यांना करावयाचे नाही
खरे म्हणजे आपल्या विचारसरणीची, आपल्या पक्षाची ही अवस्था का झाली आहे याबद्दल डॉक्टर बाबा आढाव ,डॉक्टर कुमार यांनी आमरण उपोषण करून आपण आत्मक्लेष करावा
कोणीतरी जाणता राजा आपणास उठून बसवत आहे म्हणून प्रसिद्धीसाठी या वयात आत्मक्लेष उपोषण करावे लागत आहे यासारखी दयनीय अवस्था कोणाही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यावर, नेत्यावर येऊ नये
यांनी आत्मक्लेष करण्यापेक्षा आत्मपरीक्षण व आत्मचिंतन केल्यास आपल्या सुखासीन आयुष्यामुळे आपण एका चळवळीचे पूर्ण वाटोळे केले आहे हे यांच्या लक्षात येईल
आता उर्वरित दिवस रामनाम घेत रहा असा मी यांना सल्ला देऊ शकत नाही पण त्यांनी त्यांच्या चळवळीचे अखेरचे दिवसात संघ ,हिंदुत्व ,हिंदुधर्म यांचा द्वेष करत रहावे एवढेच त्यांच्या हाती आहे
सत्तेसाठी तडजोडी करत ज्यांची पूर्ण आयुष्ये गेली त्याना आत्मक्लेषा खेरीज आता पर्याय राहिला नाही.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी
0 टिप्पण्या