शेतकरी व कर्मचारीवर्गाच्या वतीने बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान

 

शेतकरी व कर्मचारीवर्गाच्या वतीने बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज

निमगाव / प्रतिनिधी :  ओंकार साखर कारखाना चांदापुरी ता.माळशिरस युनिट एक, प्रतिदिन ऊस  गाळप क्षमता कमी होती. त्यामुळे ऊस गाळपास मर्यादा येत होत्या. ही बाब ओळखुन ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी प्रतिदिन पाच हजार मे. टन गाळप क्षमतेतेचा नवीन कारखाना उभा केला. त्यामुळे जुन्या  कारखान्याचे  व नवीन चे मिळून प्रतिदिन 6500 मे.टन  गाळप क्षमता झाल्याने या परिसरातील संपूर्ण ऊसाचे  गाळप  होणार असुन तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली.  ही बाब  प्रगतीपथावर नेणारी व आभिमानस्पद  असल्याने ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारीवर्ग, ठेकेदार, वाहतुकदार  यांच्या वतीने बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी  जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पिंगळे, रामचंद्र मगर, नितीन जाधव, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, धन्यकुमार जामदाडे, मेजर मोहन घोडके, केन मॅनेजर शरद देवकर,  इंजिनिअर धनाजी पवार, रमेश आवताडे, गणेश धायगुडे, राहुल मगर, शहाजी  शिंदे यासह बहुसंख्य कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या