झेंडे 卐साबळे यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनाक 01/12/2024 : बुद्धवाशी राजाराम गुंडीबा झेंडे (राहणार बिजवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांची नात व आयु संगीता व भाऊराव झेंडे यांची तृतीय कन्या अनिता आणि बुद्धवाशी बाबासो नाथाजी साबळे यांचे नातू व आयु सुनीता व नंदकुमार बाबासाहेब साबळे यांचे चिरंजीव अमोल यांचा मंगल परिणय रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वा. 15 मिनिट या शुभ मुहूर्तावर थाटाने संपन्न झाला. गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल थिएटर जवळ, दत्तनगर रोड, इंदापूर येथे संपन्न झालेल्या या मंगल परिणय सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.
0 टिप्पण्या