कर सल्लागार सुहास गोरे यांचा सन्मान

 

कर सल्लागार सुहास गोरे यांचा सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

भाळवणी /प्रतिनिधी दिनांक 17/11/ 2024 : येथील ज्येष्ठ पत्रकार तेज न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक प्रशांत माळवदे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेटीवर आलेले पंढरपूर येथील कर सल्लागार ॲड.सुहास गोरे यांचा  अकलूज येथील साप्ताहिक अकलूज वैभवचे संस्थापक आणि भारतीय राष्ट्रवादी  पार्टीचे राष्ट्रीय सचिव भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तर सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत ल नायकुडे यांची भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत माळवदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गोरे म्हणाले की माझा सन्मान केल्याबद्दल मी आपला आभारी आहे.तेज न्यूज चॅनल परिवारास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या