💢 महाराष्ट्रातील तीन तिघडम सरकारने जनतेची जाहीर माफी मागावी;- विठ्ठल राजे पवार 🟣 बारामती, इंदापूर, आंबेगाव, खेड राजगुरुनगर, फुलंब्री, नेवासा जालना, सिल्लोड मतदारसंघा सह (२०) वीस मतदारसंघातून उमेदवार जाहीर

💢 महाराष्ट्रातील तीन तिघडम सरकारने जनतेची जाहीर माफी मागावी;- विठ्ठल राजे पवार

🟣 बारामती, इंदापूर, आंबेगाव, खेड राजगुरुनगर, फुलंब्री, नेवासा जालना, सिल्लोड मतदारसंघा सह (२०) वीस मतदारसंघातून उमेदवार जाहीर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 19/10/ 2024 : महाराष्ट्र राज्यातील ट्रिपल इंजिन तिकडं बिगडम सरकारने पाच वर्षे शेतकरी कष्टकरी जनतेची काम करूनही भाजप सरकार मधील फडणवीस शिंदे पवार सर्व मित्र पक्षांना मतदानासाठी मतदारांच्या कडे लालच देऊन मतांसाठी पळापळ करावी लागत असेल तर भाजपा तीन तिघडी कान बिगडी सरकारने सर्वसामान्य जनतेचे बरोबर काम केले नाही याचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांना मतदारांपर्यंत जाऊन वाकावे आणि झुकावे लागते आहे, रावसाहेब दानवे पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार झुकलं आणि वाकलं देखील, असा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी आज पुणे येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी सांगितली.

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली रेवडी वाटप सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मेटाकुटीला आली आहे, महाराष्ट्र राज्य सरकारची लाडकी बहीण योजना थांबवली असल्याची खात्रीलायक माहिती महाराष्ट्र शासनाच्या कडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले, लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजनांना सरकारने एक लाख कोटीपेक्षा अधिकची लाच स्वरूपामध्ये राज्यातील मतदारांना मतांसाठी सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे पैशांचे वाटपच केल्याचा सुप्रीम कोर्टाचा आरोप आहे, आणि तसा सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढलेला आहे त्यामुळे फडणवीस शिंदे अजित पवार सरकारने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेंसारख्या आणखीन रेवडी वाटप योजनांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं ते काम गैरप्रकारे असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप सर्वसामान्य मतदार करत असल्याचे राजे पवार यांनी सांगितले, त्यामुळे यांना मतदान कोण करणार, त्यांना मतदानासाठी खूप स्ट्रगल करावा लागेल आणि एवढं काम करूनही स्ट्रगल करावा लागत असेल तर, भाजपा शिंदे पवार सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी कामगार जनतेची जाहीर माफी मागून, पुन्हा जनतेच्या दरबारात मतांसाठी जावं तरच त्यांचा निभाव लागेल अन्यथा त्यांना मतदान होणार नाही किंवा मतदार त्यांना बोलणार नाही! त्यांनी चुकी मान्य करावी, जमलं तर मतदार त्यांना माफ करतील असे वाटते. यावेळी संघटनेने संघटनेचे प्रदेश सचिव डॉ गजेंद्र पाटील प्रदेश उपसचिव काशिनाथ जाधव पाटील राष्ट्रीय सचिव यु आ सिद्दिकी प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील व शामराव पवार राष्ट्रीय कार्यकारणी समिती सदस्य यांच्या वतीने राज्यातील वीस विधानसभा मतदारसंघातील जागेवरील उमेदवारांची घोषणा केली. 

त्यामध्ये संघटनेने फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ जाधव पाटील प्रदेश उपसचिव, किंवा चंद्रसेन जाधव पाटील, जालना विधानसभा मतदारसंघातून योगेश सखाराम कदम तर पुणे जिल्हयातील आंबेगाव विधानसभा मतदार संघातून दत्ता उर्फ कृष्णकांत पोंदे पाटील, कर्जत जामखेड विधानसभा मधून राणा प्रेमजीत सिंह राजे पवार उर्फ रविशंकर पवार यांना तर इंदापूर मधून दशरथ एकनाथ माने, बारामती मधून विठ्ठल राजे पवार,, जळगाव पारोळा जामनेर मधून डॉक्टर गजेंद्र पाटील, धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून सुलभा सुर्यवंशी पाटील किंवा भिमराव गंगाधर कोळेकर, पंढरपूर मंगळवेढा मधून श्रीकांत नलावडे, किंवा सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे तर, अहमदनगर नेवासा विधानसभा मतदारसंघातून संघटनेचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, पंढरीनाथ कोतकर किंवा जगन्नाथ कोरडे पाटील , सिल्लोड मधून सरपंच श्री साबळे यांना जाहीर पाठिंबा तर कन्नड मधून मोतीलाल पवार किंवा इतर वीस जागेवरील उमेदवारांना उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या